आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीलएलच्या 14 व्या सत्राची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहेत. आयपीएल सुरु व्हायला तीन दिवस उरले नाहीत तर आयपीएल कोरोना महामारीचे सावट पडताना दिसत आहे. कारण मुंबई येथील वानखेडे स्टेडियममधील दोन कर्मचारी आणि एक प्लंबर सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले आहे. यापूवीही येथे 10 कर्मचारी आणि 6 इव्हेंट मॅनेजर पॉझिटिव्ह आढळले होते. न्यूज एजेन्सीच्या हवाल्यानुसार, वानखेडे स्टेडियममधील सर्व कर्मचाऱ्यांना प्रवास आणि बाहेर जाण्यास बंदी घातली आहे. त्यांची सोय स्टेडियम जवळील एका कल्बमध्ये करण्यात आली आहे.
वानखेडे स्टेडियममध्ये 9 एप्रिलपासून चार संघाने सामने खेळावे लागणार आहे. त्यात दिल्ली कॅपिटल (DC), चेन्नई सुपर किंग्ज (CSK), पंजाब किंग्ज (PK)आणि राजस्थान रॉयल्स (RR) या चार संघाचा समावेश आहे. याक्षणी हे चारही संघ मुंबईमध्ये असून येथे तयारी करत आहे.
महाराष्ट्रात प्रत्येक आठवड्यात वीकेंड लॉकडाऊन, परंतु आयपीएलचे सामने होणार
राज्यात कोरोना महामारीचे वाढते रुग्ण पाहून राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये 9 एप्रिलला संध्याकाळी 8 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत वीकेंड लॉकडाऊन असणार आहे. परंतु, यादरम्यान होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांना सरकारने परवानगी दिली असून खेळाडू स्टेडियम ते हॉटेल इथपर्यंत प्रवास करु शकतील. विशेष म्हणजे सामन्याच्या वेळी स्टेडियममध्ये कोणीही प्रक्षेक असणार नाही आहे.
राणा आणि पडिकक्कल यांचा अहवाल आला निगेटिव्ह
आयपीएलमध्ये आतापर्यंत 3 खेळाडूंसह 23 जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज नितीश राणा, दिल्ली कॅपिटलचा अष्टपैलू अक्षर पटेल आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (RCB) सलामीवीर देवदत्त पडिककल यांचा समावेश आहे. परंतु, आता राणा आणि पडिकक्कल यांचे अहवाल निगेटिव्ह आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.