आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CSK Vs SRH:‘ऋतु’ बरसला; चेन्नईचा पाचवा विजय; चेन्नई सुपरकिंग्जने सनरायझर्स हैदराबादला सात गड्यांनी हरवले

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शतकी भागीदारी करणारी चेन्नईची ऋतुराज गायकवाड व डुप्लेसिस जोडी.

युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (७५) व फाफ डुप्लेसिस (५६) यांच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएल १४ च्या सत्रात बुधवारी सनरायझर्स हैदराबाद संघावर ७ गड्यांनी मात केली. चेन्नईने पाचव्या विजयासह गुणतालिकेत अव्वलस्थान गाठले. हैदराबाद पाचव्या पराभवासह तळाला आहे.

प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने ३ बाद १७१ धावा उभारल्या. यात कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ५५ चेंडूंत ५७ धावा काढल्या. बेअरस्टो ७ धावांवर परतला. मनीष पांडेने ४६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह ६१ धावा केल्या. वॉर्नर व पांडे जोडीने दुसऱ्या गड्यासाठी १०६ धावांची भागीदारी केली. केन विल्यम्सनने नाबाद २६ धावा करत संघाला १५० धावांचा टप्पा गाठून दिला. केदार जाधवने नाबाद १२ धावा जोडल्या. चेन्नईच्या लुंगी एनगिडीने २ आणि सॅम करेनने एकाला टिपले.

ऋतुराज व डुप्लेसिसची शानदार शतकी भागीदारी
प्रत्युत्तरात, चेन्नईने १८.३ षटकांत ३ गडी गमाावत १७३ धावा करत विजय साकारला. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ४४ चेंडूंत ७५ धावा ठोकल्या. फाफ डुप्लेसिसने ३८ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार खेचत ५६ धावा केल्या. ऋतुराज व डुप्लेसिस जोडीने १२९ धावांची सलामी दिली. सुरेश रैना १७ धावांवर नाबाद राहिला. हैदराबादच्या राशिद खानने ३ गडी बाद केले.

दोन्ही संघ

चेन्नई : महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़, फाफ डुप्लेसिस, मोइन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, सैम करन, शार्दूल ठाकुर, लुंगी एनगिडी आणि दीपक चाहर.

हैदराबाद: डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, विजय शंकर, केदार जाधव, राशिद खान, जगदीश सुचित, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल.

बातम्या आणखी आहेत...