आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2021:पहिल्या क्वालिफायरच्या विजेत्याला आतापर्यंत सात वेळा किताबाचा कौल! आज दिल्ली-चेन्नई पहिला क्वालिफायर सामना

मुंबई / चंद्रेश नारायणन7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल २०२१ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये रविवारी दिल्ली कॅपिटल्सचा सामना चेन्नई सुपरकिंग्जशी होईल. हा सामना दुबईत खेळवला जाईल. या सामन्यातील विजेता हा सत्रातील पहिला फायनलिस्ट संघ ठरणार आहे. दुसरीकडे, पराभूत होणारा संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये एलिमिनेटरच्या विजेत्यासोबत खेळेल. साखळी फेरीनंतर दिल्ली संघ पहिल्या आणि चेन्नई दुसऱ्या स्थानी आहे. मात्र, धोनीच्या चेन्नई संघाला गत तीन लीग सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे संघ दबावात आहे. त्याचबरोबर, संघाला दिल्ली विरुद्ध दोन साखळी सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. गत वर्षी देखील दिल्लीने २ गटातील सामन्यात चेन्नईला हरवले होते. मात्र, प्लेऑफमध्ये दोन्ही संघ २ वेळा भिडले, यात चेन्नईने दोन्ही वेळा बाजी मारली. २०१२ मध्ये चेन्नईने ८६ धावांनी आणि २०१९ मध्ये ६ गड्यांनी विजय मिळवला होता. सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि डुप्लेसिसने सत्रात ५०० पेक्षा अधिक धावा केल्या. मात्र, संघाच्या मधल्या फळीने निराश केले. गोलंदाजीत शार्दूल ठाकूर संघाचा हुकमी एक्का ठरला. तो दुसऱ्या सत्रात सर्वात यशस्वी गोलंदाज बनला.

दुसरीकडे, दिल्लीचे सलामीवीर आणि मधली फळी चांगली कामगिरी करत असून दिल्लीला मोठे सामने खेळण्याचा अनुभव आहे. या संघाची सर्वात मोठी ताकद गोलंदाजी आहे.

सलग चार सामने गमावल्यानंतरही चेन्नईची ओव्हरआॅल आघाडी
लीगमध्ये चेन्नई-दिल्ली संघात आतापर्यंत २५ सामने झाले. यात दिल्लीने १० व चेन्नईने १५ जिंकले. गत चार सामन्यांत दिल्लीने विजय मिळवला आहे. त्यापूर्वी, ३ सामन्यांत चेन्नई विजेता बनला आहे. आजच्या सामन्याचा निकाल दिल्लीची गोलंदाज विरुद्ध चेन्नईची फलंदाजी निश्चित करेल.

पहिला क्वालिफायर हारणारा संघ केवळ दोन वेळा विजेता ठरला
आयपीएलच्या चौथ्या सत्रात प्रथम क्वालिफायर व एलिमिनेशनचा नियम आला होता. तेव्हापासून १० पैकी ७ वेळा क्वालिफायर-१ जिंकणारा संघ विजेता बनला आहे. दोन वेळा क्वालिफायर-१ हारणारा संघ चॅम्पियन बनला, दोन्ही वेळा मुंबई इंडियन्स विजेता बनला. एक वेळा २०१६ मध्ये एलिमिनेटर खेळणारा हैदराबाद चॅम्पियन ठरला हाेता.

बातम्या आणखी आहेत...