आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीच्या पराभवाचे विश्लेषण:फलंदाजी, कर्णधार आणि विकेटकीपिंगमध्ये ऋषभ पंतची चुक पडली महागात; आश्विनला चौथ्या षटकात दिली नाही गोलंदाजी

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसरी चुक - घाईत क्रिस मॉरिसला रन आऊट करण्याची चुक; मॉरिसने राजस्थानला विजय मिळवून दिला

इंडियन प्री‍मियर लीगमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा 3 गडी राखून पराभव केला. यामध्ये दिल्ली संघाला युवा कर्णधार ऋषभ पंतमुळे खूप मोठे नुकसान सहन करावे लागेल. पंतने या सामन्यात फलंदाजी, कर्णधार, आणि विकेटकीपिंगमध्ये चांगली कामगिरी केली नाही. यासोबतच या संघाचा महत्वाचा गोलंदाज आर आश्विनला चौथ्या षटकांत गोलंदाजी न दिल्यामुळेदेखील संघाला पराभवाचा सामना करवा लागला आहे. दिल्ली संघाला कोणत्या तीन गोष्टीमुळे पराभव स्विकारावा लागला त्याचे विश्लेषण पाहूया...

पहिली चुक - सिंगलच्या चुकीच्या कॉलमुळे रन आऊट, संघाला 20-25 धावांचा नुकसान
दिल्ली संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्ली संघाचे 36 धावांवर 3 गडी बाद झाले होते. परंतु, कर्णधार ऋषभ पंतने चांगली खेळी करत अर्धशतक केले. दरम्यान, रियान पराग यांच्या षटकात चुकीच्या कॉलमुळे त्याला रन आऊट व्हावे लागले. यामुळे संघाचे 20-25 धावांचा नुकसान झाला.

दुसरी चुक - घाईत क्रिस मॉरिसला रन आऊट करण्याची चुक; मॉरिसने राजस्थानला विजय मिळवून दिला
दरम्यान, कर्णधार पंतची दुसरी मोठी चुक ही झाली की, क्रिस मॉरिसला 18 व्या षटकांच्या पहिल्या बॉलवर रन आऊट करण्याची संधी होती. मात्र, पंतने घाईघाईत बॉल व्यवस्थित न पकडल्यामुळे ती संधी हुकली. त्यानंतर मॉरिस या संधीचा फायदा घेत शेवटच्या दोन षटकांत 4 षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.

तिसरी चुक - 3 षटकांत फक्त 14 धावा देणाऱ्या आश्विनला गोलंदाजी दिली नाही
दिल्ली संघाचा कर्णधार ऋषभ पंतकडून तिसरी चुक ही झाली की, त्याने सामन्यादरम्यान शेवटच्या षटकांत चांगली कामगिरी करणाऱ्या आर आश्विनला चौथे षटक दिले नाही. त्यामुळे इतर गोलंदाज महागात पडले असून यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

बातम्या आणखी आहेत...