आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल 2021:मॉरिस, मिलरच्या खेळीने राजस्थान विजयी; संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सचा पहिला विजय

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थानच्या डेव्हिड मिलरने सत्रात पहिले अर्धशतक साजरे केले; ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सवर 3 गड्यांनी मात

डेव्हिड मिलर (६२) अाणि क्रिस माॅरिसच्या (नाबाद ३६) तुफानी खेळीच्या बळावर राजस्थान राॅयल्स संघाने अायपीएलच्या सत्रात पहिला विजय संपादन केला. राजस्थान संघाने लीगमधील अापल्या दुसऱ्या सामन्यात गुरुवारी ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सवर मात केली. राजस्थान टीमने १९.४ षटकांत तीन गड्यांनी सामना जिंकला. यासह दिल्ली कॅपिटल्स टीमचा सलग दुसऱ्या विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने ८ बाद १४७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात राजस्थान राॅयल्स संघाने दाेन चेंडू अाणि तीन गडी राखून विजयश्री खेचून अाणली. टीमची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर जाेस बटलर (२), मनन वाेहरा (९), कर्णधार संजू सॅमसन (४) अाणि शिवम दुबे (२) हे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यानंतर डेव्हिड मिलरने संघाचा डाव सावरला. त्याने ४३ चेंडूंत ६२ धावांची शानदार खेळी केली. मात्र, त्याला साथ देणारा पराग (२) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर राहुल तेवाटिया (१९), क्रिस माॅरिस (नाबाद ३६) अाणि जयदेव उनाडकतने (नाबाद ११) खेळी करून विजय निश्चित केला.

मॉरिसच्या चार षटकारासह नाबाद ३६ धावा; डेव्हिड मिलरचे अर्धशतक
राजस्थान रायल्स संघाच्या विजयासाठी क्रिस माॅरिस (नाबाद ३६) अाणि डेव्हिड मिलरची (६२) झंझावाती अर्धशतकी खेळी महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे राजस्थान संघाला लीगमध्ये दिमाखदारपणे विजयाचे खाते उघडता अाले. यादरम्यान मिलरने ४३ चेंडूंचा सामना करताना सात चाैकार अाणि दाेन षटकारांसह ६२ धावांची खेळी केली. दुसरीकडे क्रिस माॅरिसने १८ चेंडूंत नाबाद ३६ धावा काढल्या. यादरम्यान त्याने चार उत्तंुग षटकार ठाेकून संघाचा विजय निश्चित केला.तसेच जयदेव उनाडकतने सात चेंडूंत एका षटकारासह नाबाद ११ धावा काढल्या. याशिवाय त्याने गाेलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या. तसेच क्रिस माॅरिसने एक विकेट घेतली. या दाेघांची हीच अष्टपैलु खेळी फायदेशीर ठरली.

राजस्थान रॉयल्स (RR) ने सीझनमध्ये आपला विजय साजरा केला आहे. IPL च्या सातव्या सामन्यात राजस्थानने दिल्ली कॅपिटल्सला 3 विकेटने पराभूत केले. दिल्लीविरुद्ध राजस्थानचा हा 5 पराभवानंतर पहिला विजय आहे. राजस्थानने यापूर्वी दिल्लीला 11 एप्रिल 2018 मध्ये पराभूत केले होते. क्रिस मॉरिसने 18 बॉलवर 36 धावा काढून संपूर्ण सामना बदलून टाकला.

टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 8 विकेट गमावून 147 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान टीमने 7 विकेट गमावून 150 धावा केल्या. डेव्हिड मिलरने 43 बॉलवर 62 धावा केल्या. मिलरने आयपीएलमध्ये आपले 10 वे अर्धशतक पूर्ण केले. दिल्लीसाठी आवेश खानने 32 धावा देऊन 3 विकेट घेतल्या.

दिल्लीचा सीझनमध्ये पहिला पराभव
दिल्ली टीमचा या सीझनमधील हा पहिला पराभव आहे. पहिल्या सामन्यात दिल्लीने धोनीची टीम चेन्नईला पराभूत केले होते. यासोबतच राजस्थानचा हा सीझनमधील पहिला विजय आहे.

राजस्थान रॉयल्सची सुरुवातही दिल्लीप्रमाणे खराब झाली. टीमने तिसऱ्या ओव्हरमध्येच 13 धावांवर दोन विकेट गमावल्या. क्रिस वोक्सने वोहराला 9 आणि बटलरला 2 धावांवर बाद केले. त्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये कर्णधार संजू सॅमसन 4 धावांवर बाद झाला. सीझनमधील पहिला सामना खेळात असलेल्या रबडाने सॅमसनला बाद केले.

दिल्लीचा डाव
दिल्लीने​​ ​​​​राजस्थानला विजयासाठी 148 धावांचे टार्गेट दिले. फास्ट बॉलर जयदेव उनादकटने टॉप-3 फलंदाजांना तंबूत पाठवले. त्यानंतर दिल्लीचा फलंदाज ऋषभ पंतने लीगमध्ये आपले 13 वे अर्धशतक पूर्ण केले.

दिल्ली कॅपिटल्सने 8 विकेट गमावून 147 धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंतने 32 बॉलवर 51 धावा केल्या. टॉम करनने 21 आणि डेब्यू सामना खेळणाऱ्या ललित यादवने 20 धावा केल्या. विशेष गोष्ट म्हणजे या सामन्यात एकही षटकार लागला नाही. रॉयल्स टीमकडून उनादकटने 4 ओव्हरमध्ये केवळ 15 धावा देऊन 3 मोठ्या विकेट घेतल्या.

सामन्याचा स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

ऋषभ पंतचे लीगमध्ये 13 वे अर्धशतक
88 च्या स्कोअरवर दिल्लीला पाचवा झटका लागला. कर्णधार पंत अर्धशतक पूर्ण करताच रनआउट झाला. पंतने 32 बॉलवर 51 धावा केल्या. ऋषभ पंतने लीगमध्ये 13 वे अर्धशतक पूर्ण केले. पंतने ललितसोबत 5 व्या विकेटसाठी 36 बॉलवर 51 धावांची भागीदारी केली. 100 धावांवर दिल्ल्लीची सहावी विकेट पडली. डेब्यू सामना खेळत असलेला ललित 20 धावा करून ख्रिस मॉरिसच्या बॉलवर झेलबाद झाला.

उनादकटने टॉप-3 फलंदाजांना तंबूत पाठवले
दिल्ली टीमची सुरुवात अत्यंत खराब झाली. पृथ्वी शॉ 2 धावा काढून जयदेव उनादकटच्या बॉलवर झेलबाद झाला. डेव्हिड मिलरने पृथ्वीची कॅच घेतली. दिल्लीला दुसरा झटका उनादकटनेच दिला. शिखर धवनालाही 9 धावांवर उनादकटने बाद केले. उनादकटने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रहाणेलाही आपल्याच बॉलवर कॅच केले. रहाणे 8 धावांवर बाद झाला.

दोन्ही संघ
दिल्ली : पृथ्वी शॉ, शिखर धवन, ऋषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मार्कस स्टाॅयनीस , क्रिस वोक्स, रविचंद्रन अश्विन, ललित यादव, कगिसो रबाडा, टॉम करन आणि आवेश खान.

राजस्थान : मनन वोहरा, संजू सॅमसन (कर्णधार), डेव्हिड मिलर, जोस बटलर, शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, चेतन सकारिया, जयदेव उनादकट, मुस्तफिजुर रहमान.

सध्याचा विक्रम दिल्लीच्या बाजूने : दोन्ही संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत २२ वेळा भिडले. यात दिल्लीने ११ व राजस्थानने ११ सामने जिंकले.

बातम्या आणखी आहेत...