आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL वर कोरोना संकट:दिल्ली कॅपिटल्सचा बॉलर ॲनरिक नॉर्खिया कोरोना पॉझिटिव्ह, रबाडाची कोरोना टेस्ट आली निगेटिव्ह

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थान रॉयल्ससोबतच्या सामन्याच्या एक दिवस अगोदर दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका लागला आहे. दिल्लीचा फास्ट बॉलर ॲनरिक नॉर्खिया कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. रबाडाही नॉर्खियासोबत सात तास होता. परंतु रबडाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दोन्ही खेळाडू मुंबईत क्वारंटाईन असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. दिल्ली कॅस्पिटल्स आणि IPL कडून याची अजून पुष्टी झालेली नाही. यापूर्वी दिल्लीचा लेफ्ट आर्म स्पिनर अक्षर पटेलही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

दिल्ली कॅपिटल्स गुरुवारी आपला दुसरा सामना मुंबईत राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्त्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने सीझनच्या पहिल्या सामन्यात धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले आहे.

पाकिस्तनासोबत दुसरा वनडे खेळून दोघेही मुंबईत परतले होते
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू नॉर्खिया आणि रबडा 4 एप्रिलला पाकिस्तानसोबत जोहान्सनबर्ग येथे दुसरा वनडे सामना खेळून भारतात आयपीएलमध्ये खेळण्यासाठी 5 एप्रिलला मुंबईसाठी रवाना झाले होते. दोन्ही खेळाडू 6 एप्रिलला मुंबई टीमसोबत BCCI च्या कोरोना प्रोटोकॉल नियमानुसार 7 दिवसांसाठी क्वारंटाईन झाले. 12 एप्रिलला आलेल्या रिपोर्टमध्ये नॉर्खियाचा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. रबडाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

बातम्या आणखी आहेत...