आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल 2021:दिल्ली कॅपिटल्सची नजर सलग दुसऱ्यांदा फायनल गाठण्यावर! दिल्ली-कोलकाता आज सामना

मुंबई / चंद्रेश नारायणन7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलचा किताब पहिल्यांदा जिंकण्यासाठी उत्सुक असलेला दिल्ली कॅपिटल्स संघ फायनल गाठण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे. यासाठी दिल्ली संघाला आज बुधवारी माॅर्गनच्या काेलकाता नाइट रायडर्सच्या आव्हानाला सामाेरे जावे लागेल. या दाेन्ही संघांत शारजाच्या मैदानावर दुसरा क्वालिफायर सामना रंगणार आहे. यात बाजी मारून दुसऱ्यांदा फायनल गाठण्यावर दिल्ली संघाची नजर लागली आहे. गत वर्षी दिल्ली संघाने फायनल गाठली हाेती. मात्र, संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले हाेते. दिल्ली व काेलकाता संघातील विजेत्या संघाला फायनलचे तिकीट मिळणार आहे. या विजेत्याला १५ आॅक्टाेबर राेजी फायनलमध्ये तीन वेळच्या चॅम्पियन धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्जच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. दाेन वेळच्या किताब विजेत्या काेलकाता नाइट रायडर्स संघाची नजर आता अंतिम फेरीतील प्रवेशाकडे लागली आहे. यासाठी सात वर्षांपासून काेलकाता संघ प्रयत्नशील आहे. या संंघाने २०१२ आणि २०१४ मध्ये फायनल गाठून किताब पटकावला हाेता.

दिल्ली संघाला विजयाने विक्रमाची संधी :
दिल्ली संघाने गतवर्षी आयपीएलची फायनल गाठली हाेती. त्यामुळे आता दिल्लीला पुन्हा एकदा अंतिम फेरीतील प्रवेशाची संधी आहे. यातून दिल्ली संघाला सलग दुसऱ्यांदा आयपीएल गाठून विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. याशिवाय अशा प्रकारची कामगिरी करणारा दिल्ली हा दुसरा संघ ठरेल. यापुूर्वी सलग दाेन वेळा फायनल गाठण्याची कामगिरी मुंबई आणि चेन्नई संघाने केलेली आहे. सध्या दिल्लीचा युवा कर्णधार ऋषभ पंतही फाॅर्मात आहे. त्याने आपल्या कुशल नेतृत्वात विजयी माेहीम कायम ठेवताना संघाच्या किताबाच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

काेलकाता संघ वरचढ; दिल्लीची कसरत :
दिल्ली संंघाला आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात काेलकात्याविरुद्ध विजयासाठी माेठी कसरत करावी लागणार आहे. दिल्लीला आतापर्यंत १५ वेळा काेलकाता टीमने पराभूत केले. आतापर्यंत या दाेन्ही संघांत २८ सामने झाले आहेत. यातील १२ सामन्यांत दिल्लीने विजयाची नाेंद केली.

बातम्या आणखी आहेत...