आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल 2021:षटकार खेचत धोनीने संपवला सामना, चेन्नई प्लेऑफ गाठणारी पहिली टीम

दुबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चेन्नई सुपरकिंग्जची सनरायझर्स हैदराबादवर 6 गड्यांनी मात

आयपीएल २०२१ च्या ४४ व्या सामन्यात गुरुवारी चेन्नई सुपरकिंग्जने सनरायझर्स हैदराबादवर २ चेंडू राखून ६ गड्यांनी मात केली. कर्णधार धोनीने षटकार खेचत संघाला विजयी केले. चेन्नईने ११ सामन्यांत ९ विजय मिळवत प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले. चेन्नई १२ सत्रांत ११ वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला.

प्रथम खेळताना हैदराबादने ७ बाद १३४ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात चेन्नईने १९.४ षटकांत ४ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. चेन्नईचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने ३८ चेंडूत सर्वाधिक ४५ धावा ठोकल्या. या खेळीत त्याने ४ चौकार व २ षटकार खेचले. दुसरा सलामीवीर फाफ डुप्लेसिसने ४१ धावा काढल्या. त्याने ३६ चेंडूत ३ चौकार व २ षटकार लगावले. मोईन अलीने १७ धावा जोडल्या. अंबाती रायडूने नाबाद १७ आणि कर्णधार धोनीने नाबाद १४ धावांचे याेगदान दिले. हैदराबादच्या जेसन होल्डरने ३ गडी बाद केले. तत्पूर्वी, हैदराबादच्या वृद्धिमान साहाने सर्वाधिक ४४ धावा केल्या. कर्णधार विल्यम्सन ११, अभिषेक शर्मा १८ व अष्टपैलू राशिद खानने १७ धावा काढल्या. चेन्नईच्या हेजलवुडने २४ धावांत ३ बळी घेतले. ब्राव्होने २, शार्दूल ठाकूर व रवींद्र जडेजाने एकाला टिपले.

बातम्या आणखी आहेत...