आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराIPL 2021 च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा दोन विकेटने पराभव केला. विराटच्या टीम विजयात 30 वर्षीय मिडीयम पेस ऑलराऊंडर हर्षल पटेलची मुख्य भूमिका राहिली. पटेलने 27 धाव देऊन 5 विकेट घेतल्या. IPL च्या इतिहासात मुंबई विरुद्ध एका सामन्यात 5 विकेट घेणारा हर्षल पहिला गोलंदाज ठरला आहे. या खेळीमुळे हर्षल एका रात्रीतून चर्चेत आला आहे. या परफॉर्मन्ससाठी हर्षल मागील एक दशकापासून मेहनत घेत आहे. आता हर्षलचा संघर्ष सार्थ होताना दिसत आहे. 2005 मध्ये हर्षलकडे कुटुंबातील सदस्यांसोबत अमेरिकेत स्थायिक होण्याचा पर्याय होता परंतु क्रिकेटमध्ये करिअर बनवण्यासाठी हर्षलने भारतात थांबण्याचा निर्णय घेतला.
गुजरातमध्ये झाली उपेक्षा, त्यानंतर हरियाणा टीममध्ये खेळला
हर्षल पटेलला ज्युनियर क्रिकेटचा प्रतिभाशाली खेळाडू मानले जात होते. 2008-09 मध्ये अंडर-19 वीनू मांकड ट्रॉफीमध्ये हर्षलने 23 विकेट घेतल्या होत्या. 2010 अंडर-19 वर्ल्ड कपमध्येही हर्षलची भारतीय संघात निवड झाली होती परंतु एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. सिनियर लेव्हलवर गुजरातच्या टीममध्ये निवड न झाल्यामुळे हर्षल हरियाणाला शिफ्ट झाला. 2011-12 रणजी सीझनमध्ये हर्षलने क्वार्टर आणि सेमीफायनलमध्ये सलग दोन वेळेस 8 विकेट घेतल्या. हर्षल लोअर ऑर्डरचा एक चांगला फलंदाजही राहिला.
भाऊ तपन पटेलने भारतात राहण्याचे केले होते समर्थन
वर्ष 2005 मध्ये हर्षलच्या कुटुंबीयांनी अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हर्षलला भारतात राहून क्रिकेटमध्ये करिअर करायचे होते. भाऊ तपन पटेल यांनी हर्षलच्या या निर्णयाचे समर्थन केले होते. हर्षल अमेरिकेचा ग्रीनकार्ड होल्डर असून 2008 मध्ये अमेरिकेत न्यू जर्सी क्रिकेट लीगमध्येही खेळला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.