आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत होणार आयपीएल सामने:आयोजनाला मिळाली परवानगी, नियमाचे पालन करणे सक्तीचे; ट्रेनिंग कॅम्पलाही मंजुरी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यशस्वी सामने आयोजनासाठी एमसीएने कसली कंबर

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील यंदाच्या आयपीएल सामन्यांचे अायाेजन करण्याचा मार्ग अाता मोकळा झाला अाहे. महाराष्ट्रामध्ये काेराेनाचा धोका वेगाने वाढत अाहे. यासाठी वीकेंड लाॅकडाऊनची घोषणा करण्यात अाली. मात्र, याचदरम्यान अाता महाराष्ट्र सरकारने आयपीएल सामने अायाेजनालाही परवानगी असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सामान्यांवरील अनिश्चिततेचे सावट दूर झाले अाहे. अाता मुंबईमध्ये यशस्वीपणे सामन्यांचे अायाेजन करण्यात येईल. यासाठी अाम्हाला परवानगी मिळाली असल्याची माहितीही बीसीसीआय अध्यक्ष साैरव गांगुलीने दिली. येत्या शुक्रवारपासून चेन्नईतील सामन्याने यंदाच्या १४ व्या सत्रातील अायपीएलला सुरुवात हाेणार अाहे. त्यानंतर १० अाणि १२ एप्रिल राेजी मुंबईच्या वानखेडे मैदानावर आयपीएलचे सामने हाेतील. मुंबईत १० ते २५ एप्रिलदरम्यान आयपीएलचे एकूण १० सामने हाेणार अाहेत. या वेळी आयपीएलच्या सामन्यांसाठी परवानगी देताना नियमाचे पालन करण्याचाही इशारा देण्यात अाला अाहे. याशिवाय सरावाच्या वेळामध्येही बदल करण्याचे सुचवण्यात अाले. खेळाडूंना सराव अाटाेपून सुरक्षितपणे लवकर हॉटेलमध्ये परतावे लागेल.

बायो-बबलमुळे सुरक्षित; सामने रंगणार : गांगुली महाराष्ट्रामध्ये सध्या काेराेनाच्या केसेसमध्ये वेगाने वाढत अाहे. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रामध्ये वीकेंड लाॅकडाऊनची घोषणा करण्यात अाली. त्यामुळे आयपीएल सामने अायाेजनाबाबत अडचण निर्माण झाली हाेती. मात्र, अाम्ही स्थानिक सरकारशी चर्चा केली. यातून अाम्हाला सामने आयोजित करण्याची सर्व परवानगी मिळाली आहे. मुंबईत एकूण १० सामने हाेतील. बायाे-बबल ही खेळाडूंच्या सुरक्षेसाठी अधिक महत्त्वाचे ठरेल, अशी प्रतिक्रीया बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने दिली. सामने अायाेजनाबाबत त्याने ही माहिती दिली.

यशस्वी सामने आयोजनासाठी एमसीएने कसली कंबर
मुंबईमध्ये आयपीएलचे सामने यशस्वीपणे अायाेजन करण्यासाठी अाता मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) कंबर कसली. सरकारने अायाेजनाला परवानगी दिल्यामुळे माेठी अडचण दूर झाली. त्यामुळे अाम्ही अाता हे सामने कोणत्याही अडचणीशिवाय अायाेजित करण्यासाठी प्रयत्नशील अाहाेत.

बातम्या आणखी आहेत...