आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मध्ये आता पुढे काय:विदेशी खेळाडूंना त्यांच्या घरी पोहोचवण्याचे BCCI समोर सर्वात मोठे आव्हान; युएई, ऑस्ट्रेलियासारख्या देशांकडून भारतातून येणाऱ्या फ्लाईट्सवर बंदी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे आयपीएलचा 14वा सिझन स्थगित करण्यात आला आहे. गेल्या 2 दिवसांत 3 फ्रँचायझीचे 4 खेळाडू आणि 1 स्टाफ पॉझिटिव्ह आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आणखी प्रकरणे समोर येऊ शकतात. अशा परिस्थितीत बर्‍याच संघांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे.

या पारिस्थितीमुळे भारतीय क्रिकेट बोर्डासमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे. लीगमध्ये 61 सामने होणार होते. आता बीसीसीआयवर या सर्वांना यशस्वीरित्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी आहे परंतु युएई आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे.अशा परिस्थितीत बीसीसीआयसमोर या सर्वांना सुरक्षेसह घरी पाठवणे मोठे आव्हान आहे.

100 पेक्षा जास्त विदेशी खेळाडू आणि कर्मचारी भारतात
चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद संघांमध्ये सर्वाधिक 8-8 विदेशी खेळाडू आहेत. यासोबतच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये 7 आणि राजस्थान रॉयल्समध्ये 6 विदेशी खेळाडू आहेत. यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकामधील 50 पेक्षा अधिक खेळाडू आहेत. तसेच बांगलादेश आणि वेस्टइंडिजमधील खेळाडूही या लीगशी संबंधित आहेत. एवढेच नव्हे तर या सर्व देशांचे 40 पेक्षा अधिक कर्मचारी आणि कॉमेंट्री करणारे देखील भारतात आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशने भारतातून येणाऱ्या फ्लाईट्सवर बंदी घातली
अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे यात प्रमुख देश आहेत. त्याचबरोबर, भारतामधून इंग्लंडला जाणाऱ्या लोकांना 10 दिवस कडक क्वारंटाईन ठेवण्याचे नियम पाळावे लागतील. ब्रिटन सरकारने मंजूर केलेल्या हॉटेल्समध्ये लोकांना क्वारंटाईन केले जाईल तसेच त्यांना दुसर्‍या आणि आठव्या दिवशी कोरोना चाचणी करावी लागेल.

आता खेळाडू युएई मार्गानेही त्यांच्या देशात जाऊ शकत नाहीत
युएईने काही दिवसांपूर्वीच आपले दरवाजे उघडले परंतु त्यांनीही भारतातील कोरोनाचे प्रमाण वाढल्यानंतर 14 मे पर्यंत भारतातून येणाऱ्या फ्लाईट्सवर बंदी घातली. ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅन्ड्र्यू टाय आणि इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन याच देशातून आयपीएल सोडल्यानंतर आपापल्या देशात परत गेले होते.

बातम्या आणखी आहेत...