आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरु Vs कोलकाता, अ‍ॅलमिनेटर:केकेआरने रोमांचक विजयासह क्वालिफायर-2 गाठले; पराभवासह संपला RCB आणि कर्णधार म्हणून कोहलीचा प्रवास

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या हंगामात RCB आणि KKR मध्ये एक बराबरीचा सामना झाला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 4 गडी राखून पराभव करत क्वालिफायर-2 मध्ये स्थान मिळवले, तर आरसीबीचा स्पर्धेतील प्रवास पराभवासह संपला. सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 138/7 धावा केल्या आणि 139 धावांचे लक्ष्य केकेआरने शेवटच्या षटकात 6 गडी गमावून पूर्ण केले.सामन्याचा लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याने चांगली सुरुवात केली. शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी पाच षटकांत 41 धावा केल्या. ही भागीदारी पर्पल कॅप धारक हर्षल पटेलने गिलला (29) बाद करून मोडली. यानंतर युझवेंद्र चहलने राहुल त्रिपाठीला (6) बाद करत संघाला दुसरे यश मिळवून दिले. व्यंकटेश अय्यर (26) ला हर्षल पटेलने बाद केले. नितीश राणा (23) ची विकेट चहलच्या खात्यात आली.

या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी प्रथम क्वालिफायर -1 मध्ये पराभूत संघाशी खेळेल. पराभूत होणाऱ्या संघाचा या सीजनमधील प्रवास संपून जाईल.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीने 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर इंग्लंडच्या ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील KKR ने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. हे दोन्ही कर्णधार आयपीएलनंतर लगेच होणाऱ्या टी -20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंडचे नेतृत्व करतील. दोन्ही संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात.

या सीजनमध्ये बरोबरीचा मुकाबला
या हंगामात RCB आणि KKR मध्ये एक बराबरीचा सामना झाला आहे. 18 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात आरसीबीने 38 धावांनी विजय मिळवला. त्याचवेळी, 20 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात केकेआरने 9 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला.

दोन्ही संघांत सामना विजेते
दोन्ही संघांमध्ये मॅच विनर्स आहेत. केकेआरकडे वेंकटेश अय्यर, शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठीच्या रुपात टॉप ऑर्डरमध्ये युवा आक्रमक फलंदाज आहेत. त्याचबरोबर आरसीबीकडे कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल हे मजबूत त्रिकूट आहे. केएस भारतने शेवटच्या सामन्यात एक मॅच विनिंग इनिंगही खेळली होती.

बातम्या आणखी आहेत...