आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • IPL 2021 Match Fixing Betting Update; BCCI’s New Anti Corruption Unit Chief Shabir Hussein Shekhadam Khandwawala; News And Live Updates

IPL मधील भ्रष्टाचार रोखणार नवे एसीयू प्रमुख:शाबीर हुसैन म्हणाले, सरकारने सट्टेबाजीवर घातलेली बंदी योग्य, याला कायदेशीर केल्यास सामन्यामध्ये फिक्सिंगचा धोका

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सट्टेबाजीमुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असून यामुळे त्याच्या महसूल तिजोरीत वाढ असल्याचा काही लोकांचे मत

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)शाबीर हुसैन शेखदम खांडवावाला यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACU) प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता क्रिकेटमध्ये चालणाऱ्या सट्टेबाजीला आळा बसणार आहे. कारण, त्यांचे म्हणणे आहे की, सरकारने सट्टेबाजीवर घातलेली बंदी योग्य आहे. कारण याला जर कायदेशीर मान्यता दिली तर सामन्यामध्ये सट्टेबाजीच प्रमाण वाढेल आणि हे सामन्यासाठी धोकादायक असेल.

सट्टेबाजीवर अनेक लोकांचे म्हणणे आहे की, सट्टेबाजीमुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असून यामुळे त्याच्या महसूल तिजोरीत वाढ होते. परंतु, शाबीर हुसैन यांनी विश्वास नसल्याचे ते म्हणतात. ते पुढे बोलताना म्हणाले की, सरकार याला कायदेशीर करते की नाही ही गोष्ट वेगळी आहे. परंतु, माझे मत असे आहे की, याला कायदेशीर केल्यास सामन्यामध्ये फिक्सिंगचा धोका उदभवतो.

बातम्या आणखी आहेत...