आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल 2021:दुबईत चेन्नईने 67% सामने जिंकले, मुंबईविरुद्ध विजयाची सरासरी 39%; दुबईमध्ये चेन्नईचे गत 5 सामन्यांत 4 विजय

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल २०२१ चे पुनरागमन रविवारी स्पर्धेतील दोन दिग्गज संघ चेन्नई सुपरकिंग्ज व मुंबई इंडियन्स यांच्या सामन्याद्वारे होईल. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. पहिल्या सत्रात दोन्ही संघांत झालेल्या सामन्यात ५ वेळेचा चॅम्पियन मुंबईने अखेरच्या चेंडूवर ४ गड्यांनी विजय मिळवला होता. चेन्नईला २१८ धावा केल्यानंतरही पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सत्रात सध्याचा चॅम्पियन मुंबईची कामगिरी संघर्षमय राहिली. संथ खेळपट्टीवर संघातील फलंदाज अपयशी ठरले. मात्र, यूएईची परिस्थिती वेगळी आहे. संघाने दुबईच्या मैदानावरदेखील गतसत्रात किताब जिंकला होता. अशात त्यांच्या फलंदाजीला रोखणे चेन्नईपुढे मोठे आव्हान असेल. मुंबईच्या अंतिम-११ मध्ये ६ असे खेळाडू असू शकतात, ज्यांना विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळू शकते. दुसरीकडे, चेन्नईने पहिल्या सत्रात शानदार कामगिरी केली होती.

डुप्लेसिस व ब्राव्हो सीपीएलमध्ये खेळून आले आहेत, मात्र धोनी, रैना, रायडू व ऋतुराजकडे सामन्याचा सराव नाही. सॅम भारताविरुद्ध कसोटी मालिकेत अपयशी ठरला होता. फलंदाजीत मोईन एक्स-फॅक्टर ठरू शकतो.

मुंबई संघाविरुद्ध चेन्नईचा संघर्ष
मुंबई व चेन्नई यांच्यात लीगमध्ये ३१ सामने झाले. रोहितच्या संघाने १९ आणि धोनीच्या संघाने १२ विजय मिळवले. म्हणजे चेन्नईच्या विजयाची सरासरी केवळ ३८ टक्के आहे. आयपीएल २०१३, २०१५ आणि २०१९ च्या अंतिम लढतीत मुंबईने चेन्नईला हरवले होते. मुंबईने चेन्नईविरुद्ध गत १० पैकी ८ सामने जिंकले. पोलार्ड चेन्नईविरुद्ध ४० ची सरासरी आणि १७५ च्या स्ट्राइक रेटने धावा काढतो.

दुबईमध्ये चेन्नईचे गत 5 सामन्यांत 4 विजय
चेन्नईने गतसत्रात प्लेआॅफमध्ये पोहोचू शकला नव्हता, मात्र दुबईच्या मैदानावर त्यांचा विक्रम चांगला आहे. संघाने येथे ६७ टक्के सामने जिंकले आहेत. येथे खेळलेल्या अखेरच्या ५ सामन्यांत संघाने ४ विजय मिळवले. दुसरीकडे, मुंबईने गतसत्रात येथे खेळलेल्या ५ सामन्यांत दोन लढती गमावल्या. यादरम्यान टीमचे दोन्ही पराभव सुपर ओव्हरमध्ये झाले होते आणि तीन विजय दिल्लीविरुद्ध मिळाल्या. ज्यात पात्रता व अंतिम सामन्याचा समावेश आहे.

उर्वरित सामन्यादरम्यान संघांसमाेर आव्हानात्मक परिस्थिती
दिल्ली : मधली फळी अपयशी

पहिल्या सत्रात मधली फळी अपयशी ठरली होती. स्मिथने १०४, हेटमायरने ८४ आणि स्टोइनिसने ७१ धावा काढल्या.

हैदराबाद : भारतीय फलंदाज आहे फाॅर्मात
भारतीय फलंदाजांनी पहिल्या सत्रात ६० + धावा काढल्या नाहीत. शंकरने ११ च्या सरासरीने ५८, केदारने २० च्या सरासरीने ४० धावा नाेंद.

कोलकाता : सुमार फलंदाजी अडचणीची
कोलकाताचे फलंदाज लयीत येण्यासाठी संघर्ष करताना दिसले. नितीशच्या सर्वाधिक २०१, माॅर्गनच्या ९३ व कार्तिकच्या १२३ धावा.

पंजाब किंग्ज : मदार लाेकेश राहुलवर
फलंदाजी पूर्णपणे कर्णधार लोकेश राहुलवर अवलंबून आहे. मयंकची संकटात चांगली खेळी. पहिल्या सत्रात पूरनने ६ डावांत २८ धावा केल्या.

राजस्थान : प्लेइंग इलेव्हनमध्ये विदेशी
बटलरची उणीव भरून काढण्याचे आव्हान असेल.लुइससह ग्लेन फिलिप्स पर्याय आहेत, मात्र दोघांना संघाची संस्कृती माहिती नाही.

रॉयल चॅलेंजर्स : ४ नवे विदेशी खेळाडू
संघाने हसरंगा, चमिरा, गार्टन व डेव्हिडच्या रूपात चार नव्या विदेशी खेळाडूंचा समावेश. कोणाकडे आयपीएल चा अनुभव नाही.

चेन्नई सुपरकिंग्ज : धोनी-रैनावर मदार
पहिल्या सत्रात रैनाने १२३ आणि धोनीने केवळ ३७ धावा काढल्या होत्या. दोघे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.

मुंबई : हार्दिक पंड्या जबरदस्त फाॅर्मात
पहिल्या सत्रात हार्दिकने ६ डावांत ५२ धावा केल्या होत्या. श्रीलंकाविरुद्ध ४ सामन्यांत त्याने २९ धावा केल्या.

बातम्या आणखी आहेत...