आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • IPL 2021 MI Vs RR Live, Mumbai Indians And Rajsthan Royals Live Match At Delhi Arun Jetley Stadium, News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MI Vs RR:मुंबई इंडियंसचा राजस्थान रॉयल्सवर 7 गडी राखून विजय, क्विंटन डी कॉकची 70 धावांची धडाकेबाज खेळी

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईने राजस्थानला मागील 7 सामन्यात दुसऱ्यांना पराभूत केले

IPL 2021 सीजनचा 24वा सामना मुंबई इंडियंस (MI)आणि राजस्थान रॉयल्स (RR) दरम्यान दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात मुंबईचा राजस्थावर सात गडी राखून विजय झाला आहे. हा मुंबईचा राजस्थानवर मागील 7 दुसरा विजय आहे. मुंबई या सीजनमध्ये पहिल्यांदा टारगेट चेज करण्यासाठी मैदानात उतरली होती. या विजयासह मुंबई गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे.

सामन्याचा स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 171 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने 18.3 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 172 रन काढून सामना आपल्या खिशात घातला. मुंबईचा सलामीवीर क्विंटन डिकॉकने सर्वाधिक 70 धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय, क्रुणाल पंड्या 26 बॉलमध्ये 39 रन काढून मुस्तफिजुर रहमानच्या बॉलवर आउट झाला. क्रुणालने डिकॉकसोबत तिसऱ्या विकेटसाठी 63 रनांची पार्टनरशिप केली.

मॉरिसने मुंबई इंडियंसला 2 झटके दिले
क्रिस मॉरिसने MI ला 2 झटके दिले. आधी त्याने कर्णधार रोहित शर्माला 14 रनांवर आउट केले. यानंतर, सुर्यकुमार यादवला 16 धावांवर आउट केले.

राजस्थानची कामगिरी

कर्णधार संजू सॅमसनला 42 धावांवर ट्रेंट बोल्टने क्लीन बोल्ड केले. सॅमसनने दुबेसोबत मिळून तिसऱ्या विकेटसाठी 49 बॉलमध्ये 57 रनांची पार्टनरशिप केली. तर, शिवम दुबे 31 बॉलमध्ये 35 रन काढून बुमराहच्या बॉलवर झेलबाद झाला.

राहुल चाहरने राजस्थान रॉयल्सला 2 झटके दिले

लेग स्पिनर राहुल चाहरने राजस्थानला दोन झटके दिले. चाहरने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये जोस बटलरला 41 धावांवर क्विंटन डिकॉककडे झेलबाद केले. यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये यशस्वी जायसवालला 32 रनांवर आउट केले.

दोन्ही संघ

मुंबई: रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, कीरोन पोलार्ड, राहुल चाहर, जयंत यादव, ट्रेंट बोल्ट, नाथन कुल्टर नाइल आणि जसप्रीत बुमराह.

राजस्थान : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जायसवाल, डेविड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, मुस्तफिजुर रहमान आणि चेतन सकारिया.

बातम्या आणखी आहेत...