आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • IPL 2021 Phase 2 DC Vs KKR Kolkatas Team Will Come Down To Strengthen The Position In Top 4 Delhi's Eyes Again On Number 1

दिल्ली Vs कोलकाता:केकेआरचा 3 गडी राखून विजय, सलग 4 विजयानंतर दिल्लीचा पहिला पराभव

शारजाह21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल फेज -2 मध्ये आज दोन सामने रंगणार आहे. पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. केकेआरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर दिल्लीने प्रथम खेळताना 127/9 धावा केल्या. केकेआरसमोर 128 धावांचे लक्ष्य होते, जे संघाने 3 गडीराखून पूर्ण केले. मॅचचा लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

केकेआरचा डाव ढासळला
लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताची पहिली विकेट व्यंकटेश अय्यर (14) च्या रूपात पडली. त्याची विकेट ललित यादवच्या खात्यात आली. दुसऱ्याच षटकात राहुल त्रिपाठी (9), ज्याने अवेश खानच्या षटकारासह आपले खाते उघडले, एक धाव काढून बाद झाला. यानंतर शुभमन गिल आणि नितीश राणा यांनी डाव हाताळण्याचे काम केले. गिल एका टोकाशी खेळत होता, पण नंतर कागिसो रबाडाने त्याला बाद केले आणि दिल्लीला तिसरे यश मिळवून दिले. पुढच्याच चेंडूवर आर अश्विनने कॅप्टन मॉर्गनला शून्यावर बाद करत केकेआरचे कंबरडे मोडले.

अश्विन चिडला
टीम साऊदीने दिल्लीच्या डावाच्या शेवटच्या षटकात आर अश्विनची विकेट घेतली. बाहेर पडल्यानंतर अश्विन मैदानावर चिडलेला दिसला. मैदानावर तो साऊदीला आणि नंतर कॅप्टन मॉर्गनला रागाने काहीतरी सांगताना दिसला.

चांगली सुरुवात केल्यानंतर गमावल्या विकेट
शिखर धवन आणि स्टीव्ह स्मिथने पहिल्या विकेटसाठी 35 धावा जोडल्या. चांगल्या लयीत दिसणाऱ्या धवनची (24) विकेट लॉकी फर्गसच्या खात्यात आली. बाद होण्यापूर्वी पुन्हा पुन्हा एकदा ऑरेंज कॅप शिखरकडे आली आहे. आतापर्यंत गब्बरने 454 धावा केल्या आहेत. शिखरच्या विकेटनंतर श्रेयस अय्यरची (1) कमाल आज दिसली नाही आणि सुनील नरेनने त्याला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

अर्धा संघ 89 धावांवर तंबूत परतला
कोलकाताला स्टीव्ह स्मिथ (39) च्या रूपाने तिसरे यश मिळाले. स्मिथला फर्ग्युसनने क्लीन बोल्ड केले. स्मिथच्या विकेटनंतर दिल्लीने शिमरॉन हेटमायर (4) आणि ललित यादव (0) च्या विकेट्स पटकन गमावल्या. 89 वर केकेआरने पाच बळी घेतले. अक्षर पटेल (0) च्या रूपात कोलकात्याला सहावे यश मिळाले.

कोलकात्याने संघात 2 बदल केले. दुखापतग्रस्त आंद्रे रसेलच्या जागी टीम साउथी आणि प्रसिद्ध कृष्णाच्या जागी संदीप वॉरियरला टीममध्ये सामिल करण्यात आले. त्याचबरोबर दिल्लीने देखील दुखापतग्रस्त पृथ्वी शॉच्या जागी स्टीव्ह स्मिथला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले.

दिल्ली कॅपिटल्सने 10 सामन्यांत 16 गुणांसह प्लेऑफमध्ये आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स 10 सामन्यांत 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. सध्या कोलकातासह इतर तीन संघांचेही 8-8 गुण आहेत. या दृष्टीने हा सामना कोलकातासाठी अधिक महत्त्वाचा आहे.

दोन्ही संघ

केकेआर - शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, ओन मॉर्गन (कॅप्टन), टीम साउथी, दिनेश कार्तिक (WK), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर

DC - स्टीव्ह स्मिथ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (w/c), ललित यादव, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्ट्या, अवेश खान.

बातम्या आणखी आहेत...