आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहली बनला KKR चा कोच:कोलकाता नाइट रायडर्सच्या बॅट्समनला टिप्स देताना दिसला RCB चा विराट कोहली, KKR ने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

IPL-2021 च्या दुसऱ्या पर्वात सोमवारी झालेल्या सामन्यात KKR ने RCB ला 9 गडी राखून पराभूत केले. या सामन्यात KKR च्या व्यंकटेश अय्यर याने 27 चेंडू खेळून 41 धावा काढल्या. RCB ला पराभूत करण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. त्याने 7 चौकार आणि 1 षटकार लगवला. मध्य प्रदेशकडून रणजी खेळणाऱ्या व्यंकटेशचा हा IPL चा पहिलाच सामना होता.

याच दरम्यान, स्टेडिअमचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यामध्ये RCB चा विराट कोहली चक्क KKR च्या व्यंकटेशला बॅटिंग टिप्स देताना दिसून येत आहे. विराट कोहली व्यंकटेशला पुल शॉट खेळण्यास शिकवत होता.

KKR ने आपल्या सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ सर्वप्रथम शेअर केला. नंतर डिलीटही केला. यात सुरुवातीला व्यंकटेश कोहलीकडे जाऊन पुल शॉटवर प्रश्न विचारताना दिसून येतो. यानंतर कोहलीने त्याला पुल शॉट बाबत समजावून सांगितले. सोशल मीडियावर कोहलीच्या या स्वभावगुणाचे कौतुक केले जात आहे.

KKR चा सर्वात मोठा विजय
सामन्याच्या सुरुवातीला RCB ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. RCB चा संघ केवळ 92 धावा करू शकला आणि ऑल-आउट झाला. कोलकात्याला 93 धावांचे लक्ष्य होते, जे संघाने पहिल्या 10 षटकांत केवळ एक विकेट गमावून पूर्ण केले. संघाच्या विजयात शुभमन गिलने 34 चेंडूत 48 धावा केल्या आणि IPL पदार्पण करणाऱ्या व्यंकटेश अय्यरने 27 चेंडूत 41 धावांची नाबाद खेळी केली.

बातम्या आणखी आहेत...