आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • IPL 2021 Players Leaving: More Cricketers Decide To Leave IPL 2021 Due To Rising Numbers Of Corona Cases In India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL पेक्षा जीव महत्वाचा:अश्विन आणि टायनंतर आता जम्पा आणि रिचर्डसन यांची सुद्धा आयपीएल टूर्नामेंटमधून माघार, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्णय

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरुद्ध अख्खा देश लढत आहे. दैनंदिन नवीन कोरोना रुग्णांची संख्या 3 लाखांच्या वर जात आहे. लोक मोठ्या संख्येने मृत्यूमुखी पडत आहेत. अशा वातावरणात आता आयपीएलचे खेळाडू सुद्धा काळजी म्हणून आप-आपली नावे परत घेत आहेत. आर अश्विननंतर एकूणच मोठ-मोठ्या खेळाडूंनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन आणि राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज एंड्र्यू टाय यांनी कोरोनामुळे आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आणखी दोन खेळाडूंनी आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूचा अॅडम जम्पा आणि केन रिचर्डसन यांचा समावेश आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून दुजोरा

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासंदर्भात अधिकृत दुजोरा दिला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जारी केलेल्या माहितीप्रमाणे, भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि बिघडत्या परिस्थितीमुळे खेळाडूंनी हा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी राजस्थानचा लियाम लिविंगस्टोन याने सुद्धा बायो बबलमुळे थकवा जाणवत असल्याने आपली मायभूमी इंग्लंडला परत जाण्याचा निर्णय घेतला होता.

सोशल मीडियावर दिली माहिती
दिल्लीचा हैदराबादवर सुपर ओव्हरमध्ये झालेल्या विजयानंतर अश्विनने सोशल मीडियावर लीगमधून बाहेर पडत असल्याची माहिती दिली. अश्विनने सांगितले की, कुटुंबातील सदस्य आणि इतर नातेवाईक सध्या कोरोनाशी लढत आहेत. या कठीण परिस्थितीमध्ये मला त्यांच्यासोबत राहण्याची इच्छा आहे. परिस्थिती सुधारल्यास मी पुन्हा खेळण्यासाठी मैदानावर उतरेल. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...