आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलवर काेराेनाचे सावट:खेळाडूंना आयपीएलमधून परत बोलावण्यासाठी ईसीबीवर दबाव

लंडन/मुंबई/मेलबर्न10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑस्ट्रेलियाच्या 3 खेळाडूंच्या माघारीनंतर स्थानिक सरकार व काउंटी दबाव टाकत आहे

भारतात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता त्याचा परिणाम हळूहळू आयपीएलवर दिसत आहे. रविवार व सोमवारी चार खेळाडूंनी माघार घेतली. यात भारताचा आर. अश्विन व ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. आता इंग्लंडचे खेळाडू लीगमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. ब्रिटिश मीडियानुसार, इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळावर (ईसीबी) आपल्या देशाच्या खेळाडूंना आयपीएलमधून परत बोलावण्याचा दबाव आहे. ईसीबी स्थानिक सरकार व काउंटीच्या दबावामुळे कधीही खेळाडू परत बोलावू शकतो. ईसीबीच्या प्रवक्त्याने म्हटले की, ‘इंग्लंडला या वर्षी भारताच्या महिला व पुरुष दोन्ही संघांच्या मालिकेचे आयोजन करायचे आहे. त्याचबरोबर नवीन स्पर्धा द हंड्रेडमध्येदेखील भारतीय खेळाडूंना सहभागी करून घेऊ इच्छित आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी नाजूक परिस्थिती आहे. जर गव्हर्निंग बॉडीने खेळाडूंना परत बाेलावले, तर बीसीसीआयच्या संबंधांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

सीएने परतण्याची व्यवस्था करावी : लिन
मुंबई इंडियन्सच्या ख्रिस लिनने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला (सीए) यंदाची आयपीएल समाप्त झाल्यानंतर खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी खासगी विमानाची व्यवस्था करावी, असा आग्रह केला आहे. लिनने म्हटले की, ‘सीए आमच्या प्रत्येक आयपीएल करारातील १० टक्के निधी घेते. त्यामुळे यंदाची रक्कम खासगी विमानावर खर्च केली जावी, ज्यामुळे आम्ही सहज मायदेशी परतू शकू. आम्ही खूप जैवसुरक्षित वातावरणात आहोत. आम्ही सर्व धोका पाहून आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आमचीही केवळ स्पर्धा समाप्त होताच, लवकरात लवकर मायदेशी परतण्याची इच्छा आहे.’

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी मायदेशी परतण्याची व्यवस्था स्वत: करावी : पंतप्रधान स्कॉट मॉरिसन
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन मंगळवारी म्हणाले की, आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंनी मायदेशी परतण्याची व्यवस्था स्वत: करावी. ऑस्ट्रेलियाने कोरोनाचा वाढता धोका पाहता भारतातून येणाऱ्या सर्व विमानांवर १५ मेपर्यंत बंदी घातली आहे. मॉरिसन म्हणाले की, ‘ते वैयक्तिक दौऱ्यावर गेले आहेत. तो कुठल्याही ऑस्ट्रेलियन दौऱ्याचा भाग नाही. ते स्वत:च्या सुविधांसह भारतात पोहोचले होते. त्याचा उपयोग करत पुन्हा ऑस्ट्रेलियात परततील.’

बातम्या आणखी आहेत...