आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL फेज-2 चा होस्ट कोण:इंग्लंडसहित 4 देशांकडून आयोजनाची ऑफर, मागील सिझन होस्ट करण्यासाठी BCCI ने UAE ला दिले होते 98.5 कोटी रु

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंड, युएईनंतर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकासारख्या आणखी 2 देशांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(BCCI) ला आयपीएल 2021चे उर्वरित सामने होस्ट करण्याची ऑफर दिली आहे. कोरोनामुळे 29 सामन्यांनंतर आयपीएलचे 14 वे सत्र स्थगित करण्यात आले होते.

आता बीसीसीआय उर्वरित 31 सामन्यांसाठी 20 दिवसांची विंडो शोधत आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि युएईने देखील आयपीएलचे आयोजन केले आहे. मागील सिझन युएईमध्ये झाला होता आणि इनसाइड स्पोर्टच्या अहवालानुसार बीसीसीआयने यासाठी 98.5 कोटी रुपये दिले होते.

टाइट शेड्युल आणि कोरोनामुळे ही विंडो सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे. भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे बीसीसीआय पुन्हा येथे सामने घेण्याची जोखीम घेऊ इच्छित नाही. मागील सिझनप्रमाणे युएईमध्येही सामने पूर्ण केले जाण्याची चर्चा होती. परंतु इंग्लंडमध्ये 14 सप्टेंबरपर्यंत भारताला कसोटी खेळायची आहे. अशा परिस्थितीत इंग्लंडचे 4 काऊन्टी क्लब मिडलसेक्स, सरे, वारविक्शायर आणि लँकशायर यांनीही आयपीएल घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. आता श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया बोर्डानेही या स्पर्धेचा फेज-2 आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. कदाचित आणखी बरेच देश आयपीएल होस्ट करण्याची ऑफर देऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...