आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मध्ये झिरोचा रेकॉर्ड:रोहित 200 सामन्यात 13 वेळेस शून्यावर बाद, 13 खेळाडू 10 किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस शून्यावर बाद होऊन तंबूत परतले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन प्रीमियर लीग (IPL)च्या 14व्या सिझनची सुरुवात 9 एप्रिलपासून होत आहे. त्यापूर्वी आम्ही तुम्हाला फलंदाजांचे असे काही रेकॉर्ड सांगत आहोत, जे कोणालाही बनवण्याची इच्छा नसते. हे रेकॉर्ड चांगली गोलंदाजी किंवा फलंदाजांच्या खराब फॉर्ममुळे बनतात. हा रेकॉर्ड म्हणजे सर्वात जास्त वेळेस शून्यावर आऊट होण्याचा. आयपीएलमध्ये आतापर्यंत 13 खेळाडू 10 पेक्षा किंवा त्येपेक्षाही जास्त वेळेस शून्यावर बाद झाले आहेत. यामध्ये एक विदेशी फलंदाजही आहे तो म्हणजे ऑस्ट्रेलिया टीमचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल.

मॅक्सवेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 82 सामने खेळले असून यातील 10 सामन्यात खातेही उघडलेले नाही. मॅक्सवेल आतापर्यंत दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्सकडून खेळाला आहे. 14 व्या सीझनसाठी त्याला विराट कोहलीच्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 14.25 कोटी रुपयात खरेदी केले आहे.

रोहित-रहाणे 13 वेळेस शून्यावर बाद
टूर्नामेंटमध्ये 4 खेळाडू सर्वात जास्त 13 वेळेस शून्यावर बाद झाले आहेत. हे फलंदाज रोहित शर्मा, हरभजन सिंह, पार्थिव पटेल आणि अजिंक्य रहाणे आहेत. रोहितने आपल्या कप्तानीमध्ये मुंबई इंडियन्सला पाच वेळेस आयपीएल चॅम्पियन बनवले आहे. 200 सामने खेळणारा तो दुसरा खेळाडू आहे. रोहितच्या पुढे धोनी आहे. धोनीने एकूण 204 सामने खेळले आहेत.

लिस्टमध्ये मॅक्सवेल एकटा खेळाडू, ज्याने 100 पेक्षा कमी सामने खेळले आहेत
शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंमध्ये मॅक्सवेल एकमेव असा खेळाडू आहे ज्याने 100 पेक्षा कमी सामने खेळले आहेत. या ऑस्ट्रेलियन खेळाडूने आतापर्यंत 82 सामने खेळले आहेत. याव्यतिरिक्त मनदीपसिंहने 104 सामने खेळले आहेत. इतर सर्व खेळाडूंनी 130 पेक्षा जास्त सामने खेळले.

बातम्या आणखी आहेत...