आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • IPL 2021 SRH Vs RR Live Hyderabad Will Look For Change Of Fortune Loss Will Put Rajasthan In The Last Place; News And Live Updates

SRH Vs RR LIVE:हैदराबादची तिसरी विकेट 85 धावांवर कोसळली, मॉरिसने विजय शंकरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. राजस्थानचे 221 धावांचे लक्ष्य

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थान रॉयल्सची हैदराबादविरुद्धची सर्वात मोठी धावसंख्या ​​​​​​​

देशात सध्या आयपीएल 2021 च्या चौदाव्या सीजनची सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज यातील 28 वा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या संघादरम्यान दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमध्ये खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत राजस्थान संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 220 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने 3 गडी गमावल्यानंतर 80+ धावा केल्या आहेत. कर्णधार केन विल्यमसन आणि केदार जाधव सध्या क्रीजवर आहेत.

डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत सलामीवीर आलेल्या मनीष पांडे 20 चेंडूत 31 धावांवर बाद झाला. सहाव्या षटकानंतर, स्ट्रॅटेजिक टाइम घेण्यात आला होता. त्यानंतर मुस्तफिजुर रहमानने 7 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मनीषला क्लीन बोल्ड केले. यानंतर जॉनी बेअरस्टो 21 चेंडूंत 30 धावांवर बाद झाला. त्याला अनुज रावतच्या हातात राहुल तेवतियाने झेलबाद केले. बेअरस्टो आणि मनीष यांच्यात 57 धावांची सलामीची भागीदारी होती.

राजस्थान रॉयल्सची हैदराबादविरुद्धची सर्वात मोठी धावसंख्या ​​​​​​​

विशेष म्हणजे राजस्थान रॉयल्सची ही धावसंख्या हैदराबादविरुद्धची सर्वात मोठी धावसंख्या आहे. तत्पूर्वी, हैदराबाद संघाने राजस्थानविरुद्ध 2019 मध्ये 2 विकेट्सवर 198 धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये राजस्थानची आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या 226 ची असून 2020 मध्ये पंजाब किंग्ज विरूद्ध बनवले होते.

दरम्यान, जोस बटलर 64 चेंडूंत 124 धावांवर करत बाद झाला असून हे त्यांचे आयपीएलमधील पहिले शतक आहे. त्यांनी खेळीदरम्यान 11 चौकार आणि 8 षटकार लगावले आहे. विशेष म्हणजे हे आयपीएलमधील तिसरे शतक आहे. यापूर्वी संजू सॅमसनने पंजाब किंग्ज आणि देवदत्त पडिकक्कलने आरआर विरुद्ध शतक झळकावले होते. मात्र, या संघादरम्यान, सॅमसन अर्धशतकापासून मुकला आहे. सॅमसन 33 चेंडूत 48 धावांवर बाद झाला असून त्याला विजय शंकरने अब्दुल समदच्या हाती झेलबाद केले. बटलर आणि सॅमसनने दुसर्‍या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी केली.सामन्याचा लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

राजस्थानची पहिली विकेट 17 धावांवर कोसळली

आरआरची पहिली विकेट 17 धावांच्या स्कोअरवर कोसळली असून लेगस्पिनर राशिद खानने यशस्वी जयस्वालला बाद करत पहिला धक्का दिला. जयस्वालने 13 चेंडूत 12 धावा केल्या आहेत.

हैदराबादनेही बटलरला धावबाद होण्याची संधी गमावली.
हैदराबादनेही बटलरला धावबाद होण्याची संधी गमावली.

दोन्ही संघात 4-4 परदेशी खेळाडूंचा समावेश
हैदराबाद संघातील परदेशी खेळाडूंमध्ये कॅप्टन विल्यमसन, नाबी, राशिद खान आणि जॉनी बेअरस्टो हे आहेत. तर राजस्थान संघात जोस बटलर, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस आणि मुस्तफिजुर रहमान यांचा समावेश आहे.

दोन्ही संघ
राजस्थानः
संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, डेव्हिड मिलर, रायन पराग, राहुल तेवतिया, अनुज रावत, ख्रिस मॉरिस, कार्तिक त्यागी, मुस्तफिजुर रहमान आणि चेतन सकरिया.

हैदराबादः केन विल्यमसन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, विजय शंकर, मोहम्मद नबी, केदार जाधव, रशीद खान, अब्दुल समद, संदीप शर्मा, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार.

बातम्या आणखी आहेत...