आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल 2021:आयपीएल आजपासून; संध्या. 7:30 वाजता पहिला सामना, दुबईच्या रेस्तराँत लाडू, पावभाजीचाही मेन्यू!

दुबई / शानीर एन. सिद्दिकीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल-२०२१ च्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ दुबईत रविवारपासून होत आहे. पहिल्या दिवशी चेन्नई सुपरकिंग्ज व मुंबई इंडियन्सदरम्यान लढत होत आहे. आयपीएलसोबतच दुबईच्या बाजारपेठांत उत्साह दिसून येत आहे. ग्राउंडमध्ये तिकिटांच्या विक्रीसह हॉटेल्स, बार व रेस्तराँच्या मार्केटमध्येही उत्साह दिसत आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे अनेक क्रीडारसिक स्टेडियममध्ये न जाता टीव्ही स्क्रीनवर सामन्याचा आनंद घेऊ इच्छितात. यासाठी दुबईचे अनेक रेस्तराँ, हुक्का बार व बार सज्ज आहेत. दुबईत जुमेराहस्थित ‘ओल्ड कॅस्टेलो’ रेस्तराँ ‘ओल्ड इज गोल्ड’ शैलीत चाहत्यांचा पाहुणचार करतील. भारतीय-अरबी पदार्थंासह येथे २०० पेक्षा अधिक चाहते एकत्र बसून १२ टीव्ही स्क्रीन व भव्य प्रोजेक्टर स्क्रीनवर सामन्यांचा आनंद घेतील. ओल्ड कॅस्टेलोने शेफ विशेष आयपीएल थीम मेन्यूही लाँच केला आहे.

येथे चाहते राजस्थानी रॉयल बुंदी लाडू, दिल्लीवाले चिकन टॅकोस, हैदराबादी शमी कबाब, पंजाबी कटाफी कबाब, बंबइया पावभाजी स्लायडर, सुपरकिंग करी लिव्हज झिंगे, कलकत्ता फिश एन चिप्स व बँग्लोरियन मिनी इडलीचा स्वाद घेऊ शकतील. मॉकटेलसाठी कॅप्टन कूलर, हार्ट ब्रेकर, मसालेदार अमरूद यॉर्कर, बुलफ्रॉग क्रीज, किटकॅट मिल्कशेकसह इतरही लज्जतदार पदार्थ असतील. रेस्तराँचे मालक एति भसीन यांनी दै. भास्करला सांगितले की, आयपीएल सीझन परतला आहे. बारंवा शीशा कॅफेमध्ये मित्रमंडळ व कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत आयपीएल सामन्यांचा थरार अनुभवता येईल.

आयपीएल थीमवर मेन्यू, केक, मास्क, टी-शर्टही
- आयएलए रेस्तराँ आणि कॅफेने हुक्का लाउंजच्या बाहेरील भिंतीचे मोठ्या स्क्रीनमध्ये रूपांतर केले आहे. चाहते प्रशंसक अरबी भोजन व हुक्क्यासह सामना पाहू शकतील.

- दुबईच्या बेकरीच्या शोरूम्समध्ये उत्साह आहे. शारजाच्या एका बेकरीत वेलकम बॅक आयपीएल केक उपलब्ध असतील. सेल्स मॅनेजर संतोष म्हणाले, स्पर्धेचा थरार जसजसा रंगत जाईल तसतशी कॉर्पोरेट व ऑफिस पार्टीसाठी केकची मागणी वाढेल.

- अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना टीमच्या थीमचे मास्क वाटले आहेत. टीम्सच्या लोगोसह मास्क व टी-शर्टची विक्रीही जोरात आहे.

बातम्या आणखी आहेत...