आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2021:आयपीएलची सुपर फायनल आज; जेतेपदाच्या लढतीत कोलकाता आजवर अजिंक्य, मात्र चेन्नई अशा 38 टक्के सामन्यांतच विजयी

दुबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल २०२१ ची अंतिम लढत शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये होत आहे. दुबईत संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल. २ वेळचा चॅम्पियन कोलकाता आजवर एकाही फायनलमध्ये हरलेला नाही. मात्र या हंगामातील दोन्ही साखळी सामन्यांत चेन्नईची सरशी झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात कोलकाता गुणतालिकेत ७ व्या स्थानी होता. त्यांनी ७ पैकी फक्त दोनच सामने जिंकले होते. दुसऱ्या टप्प्यात ९ पैकी ७ सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली आहे.

चेन्नईविरुद्ध कोलकाताने ३३ टक्केच लढती जिंकल्या
उभयतांतील २५ साखळी सामन्यांत चेन्नईने १६, कोलकाताने ८ जिंकले. या हंगामात दोन्ही साखळी सामने चेन्नईने जिंकले. गेल्या ५ सामन्यांत कोलकाताने एकच जिंकला.

आधी गोलंदाजी करत ६ सामने जिंकले कोलकाता संघाने
चेन्नईची ३ साखळी सामन्यांत आधी फलंदाजी, पराभव झाला. आधी गोलंदाजी करून ४ सामने जिंकले. कोलकात्याने दुसऱ्या टप्प्यात ६ सामने पाठलाग करून जिंकले.

कोलकात्याने २०१२ च्या फायनलमध्ये चेन्नईला हरवले
कोलकाता तिसऱ्यांदा फायनलमध्ये आहे. याआधी दोन वेळाच विजेतेपद पटकावले. २०१२ मध्ये चेन्नईला हरवून पहिल्यांदा विजेता. यशाचा दर १००% आहे.

चेन्नई ९ व्यांदा फायनलमध्ये, ३ वेळाच मिळाले विजेतेपद
चेन्नई संघ ९ व्यांदा फायनलमध्ये गेला. आतापर्यंत तीनदा विजेतेपद तर ५ वेळा उपविजेतेपद मिळवले.म्हणजे फायनल जिंकण्याचा यशाचा दर फक्त ३८% च आहे.

कोणाचे पारडे जड : कोलकाता गेल्या ४ सामन्यांत विजयी, चेन्नईने ४ पैकी फक्त १ जिंकला

चेन्नई सुपरकिंग्ज
बलस्थान
: संघाचे सर्वात मोठे बलस्थान ऋतुराज गायकवाड व डुप्लेसिस ही सलामीची जोडी आहे. संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात या दोघांचे महत्त्वाचे योगदान राहिले. गोलंदाजीत शार्दूलसोबत दीपक व हेजलवूड बळी घेत आहेत.

दुबळेपण : मधल्या फळीत सातत्याचा अभाव आहे. धोनीची बॅट केवळ पात्रता सामन्यात चालली. २०० वा सामना खेळणारा जडेजा दुसऱ्या सत्रात ८ सामन्यांत ५ बळी घेऊ शकला.

काेलकाता नाइट रायडर्स
बलस्थान
: संघाचे अव्वल-४ फलंदाज अय्यर, गिल, राणा व त्रिपाठी सलग धावा करत आहेत. दुसऱ्या सत्रात संघाच्या यशाचे श्रेय अय्यरला दिले जातेय. युवा खेळाडू शिवम मवी व लुकी फर्ग्युसनसह वरुण व सुनील नरेन फलंदाजांना टिकण्याची संधी देत नाहीत.

दुबळेपण : माजी कर्णधार कार्तिक व सध्याचा कर्णधार मॉर्गन अपयशी ठरले. मॉर्गन सत्रात १० वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला. त्यामुळे संघाची फलंदाजी अखेरच्या षटकांत डळमळते.

बातम्या आणखी आहेत...