आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल 2021:ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात खेळाडू दाखल हाेणार यूएईमध्ये

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलचे उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये हाेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे या सप्टेंबर-ऑक्टाेबरदरम्यान हाेणाऱ्या सामन्यांसाठी फ्रँचायझींनी आपली तयारी सुरू केली. यासाठी आता ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खेळाडू हे यूएईमध्ये दाखल हाेण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान आयपीएलचे सामने यूएईमध्ये आयाेजित करण्यावर शिक्कामाेर्तब करण्यात आले. यातून फ्रँचायझींचा मार्ग मोकळा झाला. आता त्यांना आपल्या टीमच्या खेळाडूंना या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी तयारी करावी लागणार आहे. गतवर्षी या सर्व फ्रँचायझींना यूएईमधील खास हाॅटेल्समध्ये आपल्या खेळाडूंसाेबत मुक्काम ठाेेकला हाेता. आताही असेच करावे लागणार आहे. या ठिकाणी काेराेनाबाबत कडक नियमावली आहे. त्यामुळे हाॅटेलमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत सर्व खेळाडू राहणार आहेत.

दाेन्ही बाेर्डमध्ये सखाेल चर्चा :
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि अमिरात क्रिकेट मंडळ यांच्यात नुकतीच आयपीएल आयाेजनाबाबत सखाेल चर्चा झाली. यासाठी बीसीसीसीआयचे सचिव जय शहा, उपाध्यक्ष राजीव शुक्ला. काेषाध्यक्ष अरुण धुमाळ आणि आयपीएलचे चेअरमन बृजेश पटेल यांनी शेख नाहयान यांची भेट घेतली. यादरम्यान चर्चा झाली.

बातम्या आणखी आहेत...