आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरूचा सलामीवीर फलंदाज देवदत्त पड्डीकलची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. सोमवारी पहिला अहवालदेखील निगेटिव्ह आला होता. आता तो संघात दाखल झाला आहे. २२ मार्च रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तो क्वॉरंटाइनमध्ये राहिला. दुसरीकडे, संघाचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्स कोरोनाबाधित झाला. ३ एप्रिलला चेन्नईत पोहोचल्यानंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, ७ एप्रिलला झालेल्या दुसऱ्या चाचणी तो पॉझिटिव्ह आला. तो संघाकडून ९ एप्रिल रोजी एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये मुंबई विरुद्ध आपल्या अभियानास सुरुवात करणार होता. त्याच्या व्हायरसचे लक्षणे नाहीत, त्याला आयसोलेशनमध्ये ठेवले.
धोनीने मला स्लो बाउन्सरचा सल्ला दिला : हैदराबादचा गोलंदाज टी. नटराजनने म्हटले की, धोनीमुळे आयपीएल २०२० मध्ये चांगली गोलंदाजी करू शकलो. गत आयपीएलमध्ये धोनीने मला स्लो बाउन्सर व कटर्स चेंडू टाकण्याचा सल्ला दिला होता. सत्रातील उत्कृष्ट गोलंदाजीमुळे त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली.
जैवसुरक्षित वातावरण वाईट स्वप्नासारखे : ग्लेन
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने म्हटले की, ‘सलग जैवसुरक्षित वातावरणात राहणे वाईट स्वप्नासारखे आहे.’ त्याने २०१९ मध्ये मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. मुंबईचा कॅरेबियन अष्टपैलू केरोन पोलार्ड व पंजाब किंग्जचा क्रिस गेल क्वॉरंटाइन समाप्त करत संघात दाखल झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.