आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2021:17 सप्टेंबरपासून यूएईमध्ये; 18 ऑक्टोबरला फायनल; बीसीसीआयचा अद्याप दुजोरा नाही; लवकरच अधिकृत घोषणेची शक्यता

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयपीएलसाठी कॅरेबियन लीग वेळापत्रकात होणार बदल

अायपीएलच्या उर्वरित ३१ सामन्यांना अाता यूएईमध्ये १७ सप्टेंबरपासून सुरुवात हाेणार अाहे. त्यानंतर १८ अाॅक्टाेबर राेजी आयपीएलच्या किताबासाठी फायनल सामना हाेईल, अशी सूत्रांनी माहिती दिली. मात्र, अद्याप याला बीसीसीआयने कोणत्याही प्रकारचा दुजोरा दिला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीअाय) शनिवारी आयपीएल अायाेजनाबाबत शनिवारी मुंबईतील बैठकीमध्ये सखोल चर्चा केली. यातूनच अाता आयपीएलच्या दुसऱ्या फेज अायाेजनावर ठाेस असा निर्णय लवकरच घेण्यात येईल. याचदरम्यान विंडीजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग हाेणार अाहे.

ही लीग २८ अाॅगस्ट ते १९ सप्टेंबर अाहे. अाता बीसीसीआय या लीगच्या वेळापत्रकातही काहीसा बदल करण्यासाठी विंडीज मंंडळासाेबत चर्चा करणार अाहे. यातून विंडीजच्या खेळाडूंचा अायपीएलमधील सहभाग निश्चित हाेणार अाहे. त्यामुळे अाता या कॅरेबियन लीगच्या वेळापत्रकात लवकरच बदल हाेणार अाहे. याचीही घाेषणा विंडीज बाेर्ड करेल. त्यामुळे ही लीग अाठवडाभरापुर्वीच अाटाेपण्याचा सल्ला बीसीसीअायने दिला अाहे. यातून १० सप्टेंबरला लीगची फायनल हाेण्याचे चित्र अाहे.

ईसीबीसाेबत सखाेल चर्चा : धुमाळ
सप्टेंबर-अाॅक्टाेबरदरम्यान अायपीएलचे उर्वरित ३१ सामने अायाेजनावर बीसीसीआय सध्या ठाम अाहे. मात्र, याचदरम्यान इंग्लंड टीम विदेश दाैरा अाणि घरच्या मैदानावर सामने खेळणार अाहे. त्यामुळे या टीमच्या खेळाडूंना अायपीएलमध्ये सहभागी हाेता येणार नाही. यासाठी अाता बीसीसीअायने इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळासोबत (इसीबी) सखाेल चर्चेसाठी पुढाकार घेतला. ‘अाम्ही इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी हाेण्याबाबत बाेर्डासाेबत चर्चा करत अाहाेत. यातून लवकरच निर्णय हाेईल, अशी प्रतिक्रिया काेषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी दिली.

केकेअारच्या गोलंदाज कमिन्सने घेतली माघार
कोलकाता नाइट रायर्ड्स टीमच्या वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने अागामी अायपीएलमधून माघार घेतली. त्यामुळे अाता हा अाॅस्ट्रेलियन गाेलंदाज अायपीएलच्या उर्वरित ३१ सामन्यांमध्ये खेळणार नाही. याशिवाय इतर अाॅस्ट्रेलियन खेळाडूंचाही या लीगमधील सहभाग अडचणीत सापडला अाहे. कारण, यादरम्यान अाॅस्ट्रेलिया टीम विंडीजचा दाैरा करणार अाहे. या दाैऱ्यात पाच टी-२० अाणि तीन वनडे सामन्यांची मालिका अायाेजित करण्यात अाली. त्यामुळे अाॅस्ट्रेलियन खेळाडू जुलै महिन्यात विंडीज दाैऱ्यावर रवाना हाेतील.

बातम्या आणखी आहेत...