आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2021:आयपीएलमध्ये विदेशी खेळाडू खेळणे कठीण; विदेशी संघांच्या कार्यक्रमाकडे लक्ष न दिल्यास लीगला अडचण येईल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयपीएलदरम्यान सर्व प्रमुख संघांचा कार्यक्रम

आयपीएल २०२१ च्या उर्वरित दुसऱ्या सत्राची सुरुवात १८ किंवा १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये हाेऊ शकते. मात्र, स्पर्धेत विदेशी खेळाडू सहभागी होण्यावर प्रश्नचिन्ह आहे, कारण व्यस्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रम. बीसीसीआयने लीगचे नियोजन विदेशी संघांचे वेळापत्रक न पाहताच बनवले आहे. त्यामुळे बीसीसीआयला अडचण येऊ शकते.

ऑक्टोबरमध्ये टी-२० विश्वचषक आहे. त्यामुळे विविध संघ त्यापूर्वी मर्यादित षटकांची मालिका खेळत आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान खेळाडूंना आयपीएलसाठी परवानगी दिली जाणार नाही, असे इंग्लंड व न्यूझीलंडने यापूर्वी स्पष्ट केले. बीसीसीआय २९ तारखेला होणाऱ्या विशेष सर्वसाधारण बैठकीनंतर अधिकृत तारखेची घोषणा करेल.

आयपीएलदरम्यान सर्व प्रमुख संघांचा कार्यक्रम

  • इंग्लंड - ३ वनडे, टी-२० मालिकेसाठी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बांगलादेश दौरा. लगेच पाकसोबत टी-२० मालिका. मोईन, रॉय, स्टोक्स, आर्चर, मॉर्गन, बटलर, लिव्हिंगस्टोन, सॅम करेन, टॉम करेन, वोक्स, बिलिंग्स, मलान, जॉर्डन व बेयरस्टो आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर असतील.
  • न्यूझीलंड - न्यूझीलंड पाकिस्तान विरुद्ध सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये यूएईत ३ वनडे व टी-२० सामन्यांची मालिका खेळेल. त्यामुळे विल्यम्सन, मिलने, बोल्ट, सेंटनर, फर्ग्युसन, सीफर्ट, एलन व जेमिसन उपलब्ध राहणार नाही.
  • ऑस्ट्रेलिया - श्रीलंका टी-२० व वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. मॅक्सवेल, कमिन्स, वॉर्नर, रिचर्डसन, स्टोइनिस, स्मिथ, मेरेडिथ, केन रिचर्डसन, सॅम्स, जम्पा, हेनरिक्स मालिकेत खेळताना दिसतील.
  • बांगलादेश - इंग्लंड संघ बांगलादेश दौऱ्यावर असल्याने शाकिब व मुस्तफिजुरचे लीगमध्ये खेळणे कठिण आहे.
  • अफगाणिस्तान - पाक विरुद्ध यूएईमध्येच सप्टेंबरमध्ये वनडे व टी-२० मालिका खेळेल. राशिद, नबी व मुजीबकडे वेळ नसेल.
  • वेस्ट इंडीज - खेळाडू १९ सप्टेंबरपर्यंत घरची टी-२० लीग सीपीएल खेळतील. क्वाॅरंटाइनमुळे ते उशिरा उपलब्ध होतील.
  • दक्षिण आफ्रिका - द. आफ्रिका सप्टेंबरमध्ये हॉलंड विरुद्ध मालिका खेळेल. मात्र, त्यांच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी मिळू शकते.

बातम्या आणखी आहेत...