आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील वाढती कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता मधातच आयपीएल 2021 ला रोखण्यात आले आहे. बीसीआयने आता सर्व परदेशी आणि देशी खेळाडूंना घरी पोहचवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने तर देशांर्तगत खेळाडूंना बसने घरी पोहचवण्यात येत आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधार महेंद्र सिंह धोनी मैदानाबाहेरदेखील सुपर कर्णधारपद भूषवताना दिसले आहे. कारण महेंद्र सिंह धोनीने सांगितले की, 'जोपर्यंत संघातील सर्व सहकारी सुखरुपपणे घरी पोहचत नाही तोपर्यंत मी हॉटेल सोडून जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.'
कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या 39 वर्षाचे असून ते दिल्लीतील एका हॉटेलमध्ये राहत आहे. संघासोबत परदेशी खेळाडूंमध्ये डु प्लेसिस आणि ड्वेन ब्रावोचा समावेश आहे. CSK फ्रँचायझीने खेळाडूंना पोहचवण्यासाठी 10 सीटर चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली आहे.
सर्वात आधी विदेशी खेळाडूंना पोहचवण्यात यावे
सुत्रांच्या माहितीनुसार, धोनीने सांगितले की, सर्वात आधी परदेशी खेळाडूंना रवाना केल्यानंतर देशातील खेळाडूंना पाठवण्यात यावे. पुढे ते म्हणाले की, जेव्हा सर्व सहकारी व्यवस्थितरित्या घरी पोहचतील त्यानंतर शेवटच्या विमानाने आपण जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.