आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयची स्पेशल बैठक:आयपीएल कधी व कुठे आज निश्चित; देशांतर्गत स्पर्धेवर निर्णय, गांगुली मुंबईमध्ये दाखल

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या १४ व्या सत्रातील आयपीएलचे उर्वरित ३१ सामने कुठे आणि कधीपासून सुरू करण्यात येतील, यावर बहुप्रतीक्षित विषयावर ठाेस निर्णय घेण्यात येईल. याशिवाय देशांतर्गत स्पर्धांसह यंदाच्या टी-२० विश्वचषक आयाेजनही निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीसीआय) खास बैठक आयाेजित करण्यात आली. मुंबईमध्ये आयाेजित बैठकीसाठी अध्यक्ष साैरव गांगुली शुक्रवारी मुंबईत दाखल झाला आहे.

आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या आयाेजनाचा मुख्य अजेंडा हा असेल. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. याशिवाय या बैठकीमध्ये देशांतर्गत स्पर्धांच्या आयाेजनावर चर्चा हाेईल. तसेच भारतामध्ये आॅक्टाेबर-नाेव्हेंबरमध्ये आयसीसीचा टी-२० वर्ल्डकप हाेणार आहे. या स्पर्धेच्या आयाेजनाबाबतही चर्चा हाेईल. सध्या काेराेनामुळे भारतामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे या स्पर्धेचे भारतामध्ये आयाेजन काहीसे आव्हानात्मक आहे. त्यामुळेच ही स्पर्धा यूएईमध्ये आयाेजित करण्यावर सध्या विचार केला जात आहे.

गतवर्षी काेराेना आणि महामारीमुळे रणजी ट्राॅफी स्पर्धेचे आयाेजन हाेऊ शकले नाही. त्यामुळे आता या स्पर्धेबाबतही बीसीसीआयला निर्णय घ्यावा लागणार आहे.

नुकसान भरपाईबाबत चर्चा :
रणजी ट्राॅफी स्पर्धेचे आयाेजन रद्द झाले हाेते. त्यानंतर बीसीसीआयने युवा खेळाडूंसाठी आर्थिक स्वरूपात नुकसान भरपाई देण्याची घाेषणा केली हाेती. मात्र, अद्याप ही भरपाई देण्यात आली नाही. या विषयावरही आज निर्णय हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...