आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • IPL 2021 Winner Prize Money: Awards And Prize Money IPL 2021, IPL 2021 Winner & Runner Up Team Prize Money CSK Vs KKR 2021

एक्सप्लेनर:IPL चॅम्पियन चेन्नईला मिळाले 20 कोटी, जाणून घ्या कोणावर किती पडला पैशांचा पाऊस, कोणी जिंकले सर्वाधिक पुरस्कार?

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2020 मध्ये BCCIने बक्षिसाची रक्कम अर्धी केली होती, पण नंतर निर्णय बदलला

आयपीएलच्या 14 व्या सीझनमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघ चौथ्यांदा चॅम्पियन ठरला आहे. जगातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्ज संघाने चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे. चॅम्पियन चेन्नईला ट्रॉफीसह 20 कोटी आणि उपविजेत्या कोलकाताला 12.50 कोटींचे रोख बक्षीस मिळाले आहे. अंतिम सामन्यातील सामनावीराला 5 लाख रुपये मिळाले आहेत. त्याचबरोबर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या RCB च्या हर्षल पटेलला पर्पल कॅपसह 10 लाख रुपये मिळाले आहेत. पटेलने या सीझनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने पर्पल कॅप तसेच गेमचेंजर ऑफ द सीझन आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझनचा मान पटकावला आहे. या सर्व पुरस्कारांसाठी त्याला प्रत्येकी 10-10 लाख रुपये मिळाले आहेत.

पुण्याचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने शुक्रवारी कोलकाताविरुद्ध फायनलमध्ये 32 धावांची खेळी केली. त्याने 45.36 च्या सरासरीने 16 सामन्यात 635 धावांची कमाई केली. यासह 24 वर्षीय ऋतुराज सर्वात युवा ऑरेंज कॅप विजेता ठरला. ऑरेंज कॅपसह ऋतुराज गायकवाडला 10 लाख रुपयेही मिळाले आहेत. त्याचा सलामीचा जोडीदार फाफ डुप्लेसिस दुसऱ्या क्रमांकावर राहिला. डुप्लेसिसने या हंगामात 633 धावा केल्या.

विराट कोहली आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू आहे. RCB चा कर्णधार विराट कोहलीला फ्रेंचाइजी एका सीझनसाठी 17 कोटी रुपये देते. विराटने या सीझनमध्ये एकूण 405 धावा केल्या. म्हणजेच, त्याच्या एका रनची किंमत 4 लाख 19 हजार रुपये होती.

2020 मध्ये BCCIने बक्षिसाची रक्कम अर्धी केली होती, पण नंतर निर्णय बदलला

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 2020 च्या सुरुवातीला कोरोना महामारीचे कारण देत खर्च कमी करण्यासाठी आयपीएल पुरस्काराची रक्कम अर्धी करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार विजेत्या टीमला 10 कोटी तर उपविजेत्या टीमला 6.25 कोटी रुपये मिळणार होते. पण नंतर त्यांनी हा निर्णय बदलला. आणि विजेत्याला 2019 प्रमाणे 20 कोटी रुपये मिळाले, तर उपविजेत्याला 12.5 कोटी रुपये मिळाले. प्ले-ऑफ गमावलेल्या संघाला 8.75 कोटी रुपये मिळाले. यावेळीही बक्षिसाच्या रकमेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.

सर्वात महागड्या 8 खेळाडूंपैकी फक्त धोनी अंतिम सामन्यात पोहोचला
यावेळी आयपीएलमध्ये 8 सर्वात महागड्या खेळाडूंपैकी 7 खेळाडू असे होते ज्यांना 15 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त पगार मिळाला. आठवा क्रमांकावरील ग्लेन मॅक्सवेलला RCB ने 14.25 कोटी रुपयांना खरेदी केले. या 8 खेळाडूंमध्ये चार फलंदाज, तीन बॉलिंग ऑलराऊंडर आणि एका बॅटिंग ऑलराऊंडरचा समावेश होता.

चार फलंदाजांमध्ये 17 कोटी पगारासह विराट कोहली आणि 15 कोटी पगारासह ऋषभ पंतने 400 पेक्षा जास्त धावा केल्या. त्याचबरोबर 15-15 कोटी पगार असलेल्या रोहित शर्मा आणि एमएस धोनीची फलंदाजीत कामगिरी विशेष नव्हती. रोहितने तीनशेहून अधिक धावा केल्या तर धोनीला दीडशेचा आकडाही स्पर्श करता आला नाही.

फलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा 500 पेक्षा जास्त धावा करणाऱ्यांच्या यादीत समावेश होता. मॅक्सवेलनेही 3 विकेट्स घेतल्या. त्याचवेळी, गोलंदाजीमध्ये अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसने 15 विकेट घेतल्या आणि 63 धावा केल्या. तर, आरसीबीच्या काइल जेमिसनने सामन्यांमध्ये 9 बळी घेतले. जेमिसनला आरसीबीने 15 कोटींमध्ये खरेदी केले होते.

केकेआरचा पॅट कमिन्स आयपीएलच्या दुसऱ्या लेगचा भाग नव्हता. पहिल्या लेगमध्ये त्याने 7 मॅचमध्ये 7 विकेट घेतल्या. त्याने 93 धावाही केल्या होत्या.

2020 मध्ये ज्या दोन फ्रँचायझींची ब्रँड व्हॅल्यू सर्वात जास्त घसरली होती, त्यांनी यावेळी अंतिम सामना खेळला

2020 मध्ये कोरोनामुळे आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली होती. यातही चेन्नई आणि केकेआरला ब्रँड व्हॅल्यूचा सर्वाधिक फटका बसला. गेल्या वर्षीच्या तुलनेत चेन्नईची ब्रँड व्हॅल्यू 16.5% कमी झाली, तर केकेआरची ब्रँड व्हॅल्यू 13.7% ने कमी झाली. यामध्ये कोरोनापेक्षा या संघांची कामगिरी हे मोठे कारण होते. चेन्नईने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी केली, तर कोलकाताची कामगिरीही विशेष नव्हती. मोठे भारतीय चेहरे नसल्याचे नुकसान कोलकातालाही सहन करावे लागले.

यावेळी दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली. यामुळे त्यांची ब्रँड व्हॅल्यू लक्षणीय वाढू शकते. फेब्रुवारी मार्चपर्यंत जेव्हा 2021 चा ब्रँड व्हॅल्यू अहवाल समोर येईल तेव्हा त्याचा नेमका आकडादेखील समोर येईल.

बातम्या आणखी आहेत...