आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका ओव्हरमध्ये 25 धावा:आयुष आणि लुईसने 19 व्या षटकात चैन्नईकडून हिसकावली मॅच, शिवम दुबेच्या ओव्हरमध्ये दोघांचीही तुफान खेळी

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ आणि चेन्नईच्या सुपर किंग्ज यांच्यात गुरुवारी झालेला सामना खूपच अप्रतिम होता. चेन्नईच्या संघाने लखनऊला 211 धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग लखनऊच्या संघाने 19.3 षटकांत पूर्ण केला. एका क्षणी सामना लखनऊ हातातून निसटेल असे वाटले होते, पण एविन लुईस आणि आयुष बदोनी यांनी 13 चेंडूत 40 धावांची भागीदारी करत लक्ष्य लहान केले. या दोघांनी मिळून 19व्या षटकात 25 धावा केल्या आणि सामना सहज लखनऊच्या बाजूने वळवला. शिवम दुबेचे 19 वे षटक घेणे चेन्नईला चांगलेच महागात पडले. रवींद्र जडेजा आणि मोईन अलीची षटके शिल्लक असताना शिवमला गोलंदाजी देण्यात आली होती.

19व्या षटकात दोन्ही फलंदाजांनी 25 धावा कशा केल्या हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

  • 18.1: आयुष बदोनीने शिवम दुबेच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार ठोकला.
  • 18.2: सलग दोन वाइड चेंडू दिल्यानंतर, शिवमने सरळ चेंडू टाकला ज्यावर आयुषने रन घेतला.
  • 18.3: तिसऱ्या चेंडूवर, लुईसने डीप बॅकवर्ड पॉइंटवर शानदार शॉट मारला आणि 2 धावा चोरल्या.
  • 18.4: शिवम दुबेचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, ज्याचा लुईसने फायदा घेतला आणि चौथ्या चेंडूवर शानदार चौकार मारला.
  • 18.5: पाचवा चेंडू पुन्हा एकदा खेळपट्टीवर होता आणि लुईसने या चेंडूवरही शानदार चौकार मारला.
  • 18.6: षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लुईसने लाँग ऑफवर शानदार षटकार ठोकला. यासोबतच त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले.
  • 19व्या षटकात शिवम दुबेने 25 धावा दिल्या आणि सामना पूर्णपणे लखनऊच्या हातात गेला.

लखनऊच्या सलामीच्या फलंदाजांनी सामना गाजवला
211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केएल राहुल आणि डीकॉक यांनी लखनऊ संघाला वेगवान सुरुवात करून दिली आणि दोघांनी 10.2 षटकात 99 धावा जोडल्या. राहुल 26 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. त्याने दोन चौकार आणि तीन षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 153.85 होता. त्याचवेळी डी कॉकच्या बॅटमधून 61 धावा झाल्या.

बातम्या आणखी आहेत...