आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल 2022 चा 11 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. यामध्ये पंजाबने चेन्नईला विजयासाठी 181 धावांचे लक्ष्य दिले आहे. लिविंगस्टोनने पंजाबकडून शानदार फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्हो आणि ख्रिस जॉर्डनने 2-2 विकेट घेतल्या. यादरम्यान ड्वेन ब्राव्होच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली. या विक्रमात त्याने भुवनेश्वर कुमारला मागे सोडले.
खरे तर पंजाब किंग्जविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत ब्राव्हो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या सामन्यात त्याने 3 षटकात 32 धावा देत एक विकेट घेतली. या विकेटच्या मदतीने त्याने भुवनेश्वरला मागे टाकले आहे. भुवनेश्वरने आतापर्यंत 23 विकेट घेतल्या आहेत. तर ब्राव्होने 24 विकेट घेतल्या आहेत. उमेश यादव या बाबतीत आघाडीवर आहेत.
पंजाब किंग्जविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम सध्या उमेशच्या नावावर आहे. त्याने 33 विकेट घेतल्या आहेत. तर सुनील नरेन 32 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. युजवेंद्र चहल या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 25 विकेट घेतल्या आहेत.ब्राव्हो चौथ्या क्रमांकावर आहे. ब्राव्होने नुकताच लसिथ मलिंगाचाही विक्रम मोडीत काढला आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.