आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराIPL च्या 48 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना डीवाय पाटील स्टेडियम, मुंबई येथे होणार आहे. GT 9 सामन्यांतून आठ विजयांसह 16 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. त्याचा नेट रन रेट +0.377 आहे.
दुसरीकडे, PBKS ने 9 सामने खेळून चार सामने जिंकले आहे आणि सध्या 8 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्यांचा नेट रन-रेट -0.470 आहे.
पंजाबला खेळाची पातळी सुधारावी लागेल
पंजाबने चेन्नईचा 11 धावांनी पराभव केल्यावर ते स्पर्धेत पुनरागमन करू शकतील असे वाटत होते. पण पुढच्या सामन्यात PBKSने लखनऊ सुपर जायंट्सकडून 20 धावांनी सामना गमावला. पंजाबची गोष्ट वर्षानुवर्षे अशीच आहे. या संघातील खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करून आशा निर्माण करतात आणि नंतर शेवटच्या क्षणी चाहत्यांना निराश करतात.
पंजाबचा कर्णधार राहिलेल्या केएल राहुलची बॅटने बोलत होती, मग प्रत्येक सामन्यात जिंकण्याची शक्यता वाटत होती. यंदाच्या मोसमात प्रथमच कर्णधारपद भूषवणारा मयंक अग्रवालची शांत असलेली बॅट संघाची प्लेऑफच्या शक्यता धुळीस मिळवत आहे.
पंजाबला अव्वल 4 संघांमध्ये स्थान मिळवायचे असेल, तर त्यातील प्रत्येक खेळाडूला त्यांची भूमिका समजून विजयात योगदान द्यावे लागेल.
गुजरात चांगली कामगिरी करत आहे
गुजरात टायटन्सचा संघ प्रथमच आयपीएल खेळत आहे आणि पहिल्याच सामन्यापासून हा चॅम्पियन संघ दिसत आहे. रॉकस्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली हा संघ दिग्गज संघांविरुद्ध विजय नोंदवून प्लेऑफसाठी जवळपास पात्र ठरला आहे. पण जोपर्यंत स्पर्धा संपत नाही तोपर्यंत जिंकण्याची सवय कायम ठेवली पाहिजे, असे म्हणतात.
पंजाबविरुद्धच्या आजच्या सामन्यात गुजरातचे संघ व्यवस्थापन अशा काही खेळाडूंना संधी देऊ शकते ज्यांना आतापर्यंत खेळण्याची संधी मिळाली नाही. याचा फायदा असा होईल की प्लेऑफदरम्यान कोणत्याही कारणामुळे संघ संयोजन बदलावे लागले तर गुजरातकडे आधीच पर्याय तयार असतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.