आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2022 ची सर्वात मजेदार विकेट:​​​​​​​पंजाबच्या फलंदाजाचा अतरंगी शॉट पाहून तुमचे हसू थांबणार नाही, या चेंडूवर तो बादही झाला

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात जितेश शर्माने PBKS कडून पदार्पण केले. या सामन्यात त्याने अवघ्या 17 चेंडूत 26 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एकही चौकार बाहेर पडला नाही, तर तीन षटकार निघाले. जितेशचा स्ट्राईक रेट 152.94 होता. जितेशच्या बॅटने कमाल तर केली, पण तो ज्या शॉटवर आऊट झाला तो खूप मजेशीर होता.

पंधराव्या षटकात जितेश बाद झाला
चेन्नईसाठी ड्वेन प्रिटोरियस मॅचचे 15 वे ओव्हर करायला आला. जितेशच्या सुरुवातीच्या पहिल्या चार चेंडूंवर एकही मोठा फटका खेळू शकला नाही. ज्यामुळे त्यांच्यावर थोडा प्रेशर आला. पाचव्या चेंडूवर जितेश काहीतरी वेगळे करायला गेला. प्रिटोरियसने फुल लेन्थ बॉल टाकला, बॉलमध्ये अजिबात गती नव्हती. जितेशला थर्ड मॅन बाऊंड्रीबाहेर चेंडू पाठवायचा होता आणि त्यासाठी त्याने असा हास्यास्पद शॉट खेळला, हे पाहून कॉमेंटेटरही हसू लागले.

असे वाटत होते की, पंजाबचा हा खेळाडू शेतात कुदळ चालवत आहे. जितेशला काहीतरी वेगळं करायचं होतं, पण चेंडूला गती नसल्यामुळे तो रॉबिन उथप्पाकडून झेलबाद झाला. आता त्याचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

जितेशने या सामन्यात चांगला रिव्ह्यूही घेतला
जितेश शर्माने प्रथम फलंदाजी करत धुमाकूळ घातला, त्यानंतर विकेट कीपिंग करताना घेतलेल्या एका निर्णयाने पंजाबचा विजय निश्चित झाला. 17.1 षटकांमध्ये, राहुल चहरच्या चेंडूवर धोनीचा एक फटका थेट जितेश शर्माच्या ग्लोव्हमध्ये गेला, परंतु अंपायरने नॉट आऊट दिला.

CSK ची शेवटची आशा संपवली

यानंतर जितेशने तात्काळ रिव्ह्यू घेण्याचे संकेत दिले आणि पंजाबचा कर्णधार मयंकनेही तसेच केले. खुद्द धोनीही गोंधळला होता, पण तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहिल्यानंतर चेंडू बॅटला लागल्याचे स्पष्ट झाले. अशा परिस्थितीत त्याला बाद घोषित करण्यात आले आणि CSK ची शेवटची आशाही संपली.

बातम्या आणखी आहेत...