आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवम मावीने एका षटकात 30 धावा दिल्या:मार्कस स्टॉइनिसची षटकारांची हॅटट्रिक, होल्डरनेही शेवटच्या 2 चेंडूत मारले 2 षटकार

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात शिवम मावीविरुद्ध 2 अष्टपैलू खेळाडूंची तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. 2018 मध्ये अंडर-19 विश्वचषक संघाचा भाग असलेला गोलंदाज शिवम मावीच्या 19व्या षटकाने संपूर्ण सामनाच बदलून टाकला.

वेगवान फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या मार्कस स्टॉइनिसने शिवमविरुद्ध सलग तीन षटकार ठोकले. पुढच्याच चेंडूवर स्टॉइनिस बाद झाला, पण तो बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या जेसन होल्डरनेही गोलंदाजावर दयामाया दाखवली नाही आणि सलग दोन षटकार ठोकले.

अशाप्रकारे कोलकात्याच्या 19व्या षटकात एकूण पाच षटकारांसह 30 धावा झाल्या. या षटकाचा परिणाम असा झाला की कोलकात्यासमोर विजयासाठी 177 धावांचे कठीण लक्ष्य ठेवण्यात आले.
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता...

मावीच्या षटकात स्टॉइनिसने गियर बदलला
मार्कस स्टॉइनिस 19व्या षटकाची सुरुवात होण्यापूर्वी 10 चेंडूत 10 धावांवर फलंदाजी करत होता. या मोसमात त्याच्या बॅटने काही विशेष कामगिरी झाली नाही, त्यामुळे लखनऊच्या चाहत्यांना भीती होती की, कदाचित पुन्हा संघाला स्टॉइनिसकडून निराशाच पदरी पडते की काय. मात्र, 19 वे षटक सुरू होताच या कांगारू फलंदाजाने परिस्थिती बदलून टाकली.

युवराजची आठवण झाली
स्टॉइनिसनेही षटकात पहिला, दुसरा आणि तिसरा षटकार मारला. युवराज सिंगप्रमाणे तो 6 चेंडूत 6 षटकार मारू शकतो, असे वाटत होते. मात्र, चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो श्रेयस अय्यरकरवी झेलबाद झाला.

कोलकाताला वाटले की, या षटकात जे नुकसान व्हायचे होते ते झाले. परंतु केकेआरचा हा गैरसमज होल्डरने येताच दूर केला. नवीन फलंदाज जेसन होल्डरने स्टॉइनिससारख्या आक्रमक शैलीत खेळत शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार ठोकले. 19व्या षटकात कमी अनुभवी शिवम मावीची गोलंदाजी कोलकातासाठी घातक ठरली.

बातम्या आणखी आहेत...