आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॅट कमिन्सच्या धमाकेदार खेळीनंतर बॉलिवूडचा किंग खानलाही डान्स करायची इच्छा झाली. मुंबईच्या जबड्यातून सामना हिसकावून घेतल्यानंतर अष्टपैलू आंद्रे रसेलने पॅट कमिन्ससोबत मैदानावरच नाचायला सुरुवात केली. कॅरेबियन खेळाडू त्यांच्या कूल स्टाइलसाठीही ओळखले जातात. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत शाहरुखने डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली.
कमिन्सचा कहर
बुधवारी, कोलकाता नाइट रायडर्सच्या पॅट कमिन्सने 14 चेंडूत अर्धशतक झळकावून आयपीएल 2022 मधील एंट्रीची घोषणा केली. कमिन्स हा सामान्यतः त्याच्या घातक वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु यावेळी त्याने बॅटने लाखो मने जिंकली आणि आपल्या संघाला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (MCA) येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध जवळपास हरलेल्या सामन्यात विजयी करुन दिले. कमिन्सच्या खास खेळीचे संपूर्ण क्रीडा समुदायाने कौतुक केले आणि सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया व्हायरल झाल्या.
मिठी मारून नाचण्याची इच्छा व्यक्त केली
या सामन्यानंतर शाहरुखला त्याच्या उत्साहावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि 'पाट दिए छक्के' लिहून ट्विटरवर त्याच्या टीमसाठी एक संदेश पोस्ट केला. त्याने संघाच्या विजयाबद्दल कमिन्सचे केवळ अभिनंदनच केले नाही तर आंद्रे रसेलच्या नृत्याचा संदर्भ देत कमिन्ससोबत तशाच प्रकारे नाचल्यानंतर मिठी मारण्याची इच्छाही व्यक्त केली. हा व्हायरल डान्स रसेलने सामन्याच्या शेवटी कमिन्ससोबत विजय साजरा करताना सादर केला.
पाच गडी राखून KKR ने या सीझनच्या चार सामन्यांमधील तिसरा सामना जिंकला. कमिन्सच्या धडाकेबाज फलंदाजीव्यतिरिक्त, व्यंकटेश अय्यर हा आणखी एक फलंदाज होता ज्याने 50 धावांची नाबाद खेळी केली. वेगवान गोलंदाज उमेश यादवने आपला उत्कृष्ट फॉर्म सुरू ठेवला आणि कमिन्ससह तीन बळी घेतले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.