आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुखापतीपासून थोडक्यात बचावला बोल्ट:ट्रेंट बोल्टला लाइव्ह मॅचमध्ये सहकारी खेळाडूने मारला बॉल, मैदानातच कोसळला

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल 2022 च्या सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट त्याच्याच सहकाऱ्याच्या थ्रोवर पडला. कोलकाता नाईट रायल्सच्या डावातील तिसऱ्या षटकात वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट राजस्थानकडून गोलंदाजी करत होता. बोल्टचा पहिला चेंडू केकेआरचा फलंदाज बाबा इंद्रजीतने मिड ऑनच्या दिशेने खेळला आणि धाव घेण्यासाठी धावला. फील्डिंग करत असलेल्या प्रसिद्ध कृष्णाने पटकन चेंडू पकडला आणि फलंदाजाला धावबाद करण्यासाठी विकेटकीपरच्या टोकाकडे जोरदार थ्रो फेकला, पण चेंडू विकेटला मारण्याऐवजी मध्यभागी उभ्या असलेल्या ट्रेंट बोल्टला लागला. तो खाली पडला. सुदैवाने चेंडू त्याच्या बुटावर आदळला. डायरेक्ट बोल्टला लागला असता तर तो गंभीर जखमी झाला असता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ट्रेंट बोल्टने घेतली 1 विकेट
ट्रेंट बोल्टने 4 षटकात 25 धावा देऊन एक विकेट घेतली. याशिवाय प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीपसेन यांनाही 1-1 विकेट मिळाले.

KKR ने राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने पराभव केला
कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. KKRसमोर 153 धावांचे लक्ष्य होते, जे संघाने शेवटच्या षटकात 3 गडी गमावून पूर्ण केले. नितीश राणा (48) आणि रिंकू सिंह (42) यांनी चौथ्या विकेटसाठी 38 चेंडूत नाबाद 66 धावा जोडून केकेआरचा विजय निश्चित केला.

कोलकाताचा सलग 5 पराभवांनंतरचा हा पहिला विजय आहे. संघाने स्पर्धेत आतापर्यंत 10 सामने खेळले असून 4 जिंकले आहेत. केकेआरला 6 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचवेळी आरआरचा 10 सामन्यांमधला चौथा पराभव आहे. संघाने 6 सामने जिंकले आहेत. तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करताना आरआरने 152/5 धावा केल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...