आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या 24 वर्षीय रिंकू सिंहला आयपीएलपर्यंतच्या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. कोलकाताकडून रिंकूने 23 चेंडूत नाबाद 42 धावांची खेळी केली. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांला मॅट्रिकपूर्वीच शिक्षण सोडून साफसफाईची नोकरी करावी लागली. रिंकूचे वडील सिलिंडर वितरणाचे काम करायचे. रिंकू 5 भावंडांमध्ये तिसरा आहे. त्याने नोकरीबरोबरच क्रिकेटही सुरू ठेवले. पुढे साफसफाईचे कामही सोडून त्याने आपले संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित केले.
2017 च्या IPL लिलावात पंजाबने खरेदी केले होते
रिंकू सिंहला 2017 च्या आयपीएल लिलावात पंजाब किंग्जने पहिल्यांदा 10 लाख रुपयांना खरेदी केले होते. मात्र, KKR ने त्याला 2018 मध्ये खेळण्याची संधी दिली. त्याला 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. 2019 मध्ये 5 आणि 2020 मध्ये फक्त एक सामना उतरण्याची संधी मिळाली. 2021 मध्ये तो दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला होता.
2022 च्या आयपीएलच्या मेगा लिलावात केकेआरने पुन्हा आत्मविश्वास व्यक्त केला आणि 55 लाख रुपयांना विकत घेतले. त्याचबरोबर चालू मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यांमध्ये त्याने 50 च्या सरासरीने 100 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 149.25 होता.
नितीश राणासोबत 66 धावांची नाबाद भागीदारी केली
रिंकू सिंहने नितीश राणासोबत चौथ्या विकेटसाठी नाबाद 66 धावांची भागीदारी केली. त्याने 23 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. यामध्ये 6 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याचवेळी राणाने 37 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. ज्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
कोलकाताने राजस्थानचा 7 गडी राखून पराभव केला
सोमवारी झालेल्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. हा विजय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा होता, कारण कोलकाताने 5 सामने गमावल्यानंतर विजयाची चव चाखली. या सामन्यात प्रथम खेळताना राजस्थानने 5 विकेटवर 152 धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरने 19.1 षटकांत 3 गडी राखून लक्ष्याचा पाठलाग केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.