आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमवर आमने-सामने येणार आहेत. गुजरातविषयी बोलायचे झाले तर ते पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. तर मुंबई ही अखेरच्या स्थानावर आहे.
राजस्थानला पराभूत केल्यानंतर, एमआयने अखेरीस सीझनमधील पहिला विजय मिळवला, तर गुजरातला शेवटच्या सामन्यात पंजाबकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.
अव्वल स्थानावर असताना गुजरातला आणखी एक विजय नोंदवायचा आहे
गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने सांगितले की, पंजाबविरुद्ध त्याने नाणेफेक जिंकल्यानंतर जाणूनबुजून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. खरे तर कठीण परिस्थितीत आपले खेळाडू कशी कामगिरी करतात हे त्याला पाहायचे होते. याचा परिणाम पंजाबने 16 षटकांपूर्वीच लक्ष्याचा पाठलाग केला. मात्र, या सामन्यातून आपला संघ धडा घेईल आणि आगामी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करेल, असे हार्दिकने नंतर सांगितले.
राहुल तेवतिया हा उत्तम मॅच फिनिशर आहे, पण जेव्हा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरतो तेव्हा त्याची बॅट काही विशेष दाखवत नाही. मोहम्मद शमीने मोसमाच्या सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये प्रथमच 3 विकेट घेतल्या होत्या, परंतु त्यानंतर हळूहळू त्याच्या चेंडूची कमाल कमी होताना दिसत आहे. लियाम लिव्हिंगस्टोनने त्याच्या गोलंदाजीदरम्यान जोरदार फटकेबाजी केली होती आणि 117 मीटरचा धुआंधार सिक्स देखील मारला होता. शमीला आपल्या कामगिरीत सातत्य आणावे लागेल.
बेंच-स्ट्रेंथ आजमावू शकते मुंबई
या स्पर्धेत मुंबई इंडियन्ससाठी आता काहीच उरले नाही. ज्या खेळाडूंना आतापर्यंत संघात खेळण्याची संधी मिळाली नाही, अशा खेळाडूंनाही संधी देण्याचे संकेत कर्णधार रोहित शर्माने आधीच दिले आहेत. येथून मुंबई अशा खेळाडूंना आजमावू शकते, जे येत्या काही वर्षांमध्ये प्लेइंग इलेव्हनचा महत्त्वपूर्ण भाग बनू शकेल.
ईशान किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह हे टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने टीम इंडियाचा भाग असू शकतात. अशा परिस्थितीत हे सर्वजण पुन्हा एकदा पूर्ण फॉर्ममध्ये येतील, अशी आशा चाहत्यांना असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.