आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला रोहित:चेंडू बॅटला स्पर्श करण्यापूर्वीच अल्ट्रएजमध्ये दिसला स्पाइक, थर्ड अंपायरने दिले- आऊट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला 52 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. लक्ष्य तेवढे मोठे नव्हते, पण तरीही मुंबईचा संघ 113 धावांतच ऑलआऊट झाला. या सामन्यादरम्यान सर्वाधिक वाद रोहित शर्माला बाद देण्याच्या निर्णयावरून झाला.

थर्ड अंपायरच्या या निर्णयामुळे रोहित शर्मा स्वतः खूप निराश झाला होता. या घटनेने पुन्हा एकदा तंत्रज्ञानाचा पर्दाफाश केला कारण चेंडू रोहितच्या बॅटला स्पर्श करण्यापूर्वीच अल्ट्रा-एजमध्ये स्पाइक दिसला.

थर्ड अंपायरच्या निर्णयावरून वाद
सामन्यात 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबईचा संघ मैदानात उतरला तेव्हा रोहित शर्मा आणि ईशान किशन ओपनिंगसाठी आले. चाहत्यांना रोहितकडून खूप अपेक्षा होत्या, पण पहिल्याच षटकात टीम साऊदीच्या शेवटच्या चेंडूवर हिटमॅन विकेटच्या मागे झेलबाद झाला.

थर्ड अंपायरला तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बॅट आणि बॉलममध्ये स्पाइकचा संपर्क दिसला आणि त्यानंतर सर्वजण थक्क झाले. वास्तविक, चेंडू बॅटजवळ आलाही नव्हता आणि मीटरवर स्पाइक दिसू लागले. तिसऱ्या पंचाने त्याकडे दुर्लक्ष करत रोहितला बाद घोषित केले. मुंबईच्या कर्णधारालाही या चुकीच्या निर्णयावर विश्वास बसत नव्हता.

साऊदीच्या लेन्थ बॉलवर हिटमॅन बाद
साऊदीने लेन्थ बॉल टाकला आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा बॉलच्या अँगलमुळे मोठा शॉट्स खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत रोहितने चेंडू लेग साइडच्या दिशेने टॅप करून सिंगल घेण्याचा विचार केला.

मात्र, रिव्ह्यू पाहता असे वाटले की, रोहित शॉट खेळण्यात चुकल्यानंतर चेंडू त्याच्या थाय पॅडला लागला आणि यष्टिरक्षक शेल्डन जॅक्सनच्या हातात गेला. मैदानावरील पंचांनी कॅच अपील नाकारले, ज्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सने डीआरएस घेतला.

चेंडू बॅटजवळून जाण्यापूर्वी आणि नंतर अल्ट्राएजवर मोठे स्पाइक्स होते. त्यात तांत्रिक बिघाड झाल्यासारखे दिसले कारण बॅट आणि बॉलमध्ये अंतर असल्याचे दिसत होते. परंतु तिसऱ्या पंचाला खात्री पटली आणि वादग्रस्तरीत्या बाद घोषित केले.

हे पाहून मुंबई इंडियन्सचे खेळाडू आणि चाहते आश्चर्यचकित झाले. कारण फलंदाजांना नेहमीच संशयाचा फायदा मिळत आला आहे, मात्र यावेळी रोहित नाबाद असल्याचे स्पष्ट दिसत असूनही पंचांनी चुकीचा निर्णय दिला. नंतर हिटमॅन लवकर बाद होणे हे संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण होते.

बातम्या आणखी आहेत...