आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईकरांवर IPLचा फिव्हर:मैदानाबरोबर मैदानाबाहेर देखील मुंबई इंडियन्स संघाच्या विजयाचा दावा, कर्णधार म्हणून ऋषभच्या तुलनेत रोहितचे पारडे जड

मुंबई3 महिन्यांपूर्वीलेखक: निलेश भगवानराव जोशी
  • कॉपी लिंक

क्रिकेट आणि मुंबईचे नाते मनापासून जोडले गेले आहे. कोरोनाच्या सावटामुळे गेल्या दोन हंगामात मुंबईकरांना IPLचा अनुभव घेता आला नाही. यंदा मात्र बीसीसीआयने सर्वाधिक क्रिकेट सामने मुंबईत खेळवण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुंबईकरांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. त्यात रविवारी मुंबई इंडियन्स संघाचा सामना असल्यामुळे मैदानावर तसेच मैदानाबाहेर चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. 'आमची मुंबई' म्हणत चाहते मुंबई इंडियन्सचा संघ विजयी होईल असा दावा करत आहेत.

कर्णधार म्हणून रोहितचा पारडे जड
रोहितने आपल्या कर्णधारपदात 5 वेळा (2013, 2015, 2017, 2019 आणि 2020) मुंबईला चॅम्पियन बनवले आहे. याशिवाय त्याने डेक्कन चार्जर्ससोबत 2009 मध्ये खेळाडू म्हणून आयपीएल जिंकली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने 129 सामने खेळले असून त्यात संघाने 75 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर मुंबईला 50 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 4 सामने बरोबरीत आहेत. कर्णधार रोहितची विजयाची टक्केवारी 59.68 इतकी आहे.

24 वर्षीय ऋषभ पंतने आतापर्यंत 16 सामन्यांमध्ये दिल्लीचे नेतृत्व केले आहे. संघाने 9 वेळा विजय मिळवला असून 6 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. 1 सामना बरोबरीत संपला. कर्णधार म्हणून पंतची विजयाची टक्केवारी 59.37 आहे.

बातम्या आणखी आहेत...