आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2022:राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, गोलंदाज नाथन कुल्टर नाइल दुखापतीमुळे टुर्नामेंटमधून बाहेर

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल 2022 मध्ये राजस्थानला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार गोलंदाज नाथन कुल्टर-नाईल दुखापतीमुळे आयपीएल 2022 मधून बाहेर पडला असून, त्यानंतर तो आता आपल्या देशात परतणार आहे. राजस्थान रॉयल्सने अद्याप त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा केलेली नाही. त्याचे जाणे हा राजस्थानसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

संघाने 2 कोटींना खरेदी केले होते
आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने नाथन कुल्टर-नाईलला 2 कोटी रुपयांना विकत घेतले होते. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याला ही दुखापत झाली. त्यामुळे त्याला या सामन्यात संपूर्ण षटकही पूर्ण करता आले नाही. या सामन्यात राजस्थानने बाजी मारली होती पण कुल्टर-नाईल खूप महागात पडला होता आणि त्याने 3 षटकात 48 धावा दिल्या होता.

नॅथन कुल्टर-नाईल याआधी आयपीएलमध्ये केकेआर, एमआय सारख्या संघांसाठी खेळला आहे. तो आतापर्यंत आयपीएलमध्ये 38 सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने 22.92 च्या सरासरीने 48 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्यांची इकोनॉमी केवळ 7.7 होती.

राजस्थानच्या अडचणी वाढल्या
रिपोर्ट्सनुसार, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो संपूर्ण आयपीएल सीझनमधून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत राजस्थानसाठी हा मोठा झटका आहे कारण तिसरा गोलंदाज नवदीप सैनीही काही विशेष कामगिरी करू शकलेला नाही. अशा परिस्थितीत आता त्याच्या जागी राजस्थान कोणत्या खेळाडूचा समावेश करेल हे पाहणे विशेष ठरणार आहे. राजस्थान संघ सध्या तीन सामन्यांत दोन विजय आणि एक पराभवासह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.

बातम्या आणखी आहेत...