आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यात चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात खेळल्या जात असलेल्या आयपीएल सामन्यादरम्यान एक रंजक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चेन्नईच्या खेळी दरम्यान एका जोडप्याने सर्वांची मनं जिंकली. प्रत्यक्षात असे घडले की, सामन्यादरम्यान एका मुलीने तिच्या प्रियकराला गुडघ्यावर बसून प्रपोज केले. मुलानेही आपल्या मैत्रिणीला मिठी मारली आणि अंगठी घातली आणि प्रपोजल स्वीकारले. चेन्नईच्या डावाच्या 11व्या षटकात ही जोडी टीव्ही स्क्रीनवर दाखवण्यात आली.
तेथे उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दोघांचेही अभिनंदन केले. हे अनोखे प्रपोजल मैदानात मोठ्या पडद्यावर थेट दाखवण्यात आले. आता या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्सही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने सांगितले की, मॅचदरम्यानचा एक चांगला क्षण. मुलाने बंगळुरू संघाची जर्सी घातली होती आणि मुलीनेही लाल रंगाचा ड्रेस घातला होता. दोघेही आरसीबीचे चाहते होते.
खेळाडूंनीही केले आहे प्रपोज
IPL 2021 मध्ये, चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने बिग बॉस फेम सिद्धार्थ भारद्वाजची बहीण जया भारद्वाज यांना प्रपोज केले होते. त्याने जया हिला स्टँडमध्ये सर्वांसमोर अंगठी घातली. दीपक आणि जया खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते.
या सामन्यात RCB ला शानदार विजय मिळाला
आयपीएल 2022 च्या 49 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्जचा 13 धावांनी पराभव केला. सीएसकेसमोर 174 धावांचे लक्ष्य होते, त्याला प्रत्युत्तरात संघ 160/8 धावाच करू शकला आणि सामना गमावला. डेव्हन कॉनवेने सर्वाधिक 56 धावा केल्या. कर्णधार एमएस धोनीकडून चाहत्यांना मॅचविनिंग इनिंगची अपेक्षा होती, पण तो 3 चेंडूत 2 धावा करून बाद झाला. हर्षल पटेलने 3 बळी घेतले.
सलग तीन पराभवानंतर बंगळुरुचा हा पहिला विजय ठरला. टूर्नामेंटमध्ये आतापर्यंत RCBने 11 पैकी 6 सामने जिंकले आहेत तर 5 मध्ये संघाचा पराभव झाला आहे. त्याचबरोबर चेन्नईचा 10 सामन्यांमधला हा सातवा पराभव आहे. संघाने केवळ 3 सामने जिंकले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.