आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉर्नरने दाखवली टीम स्पिरिट:शतकापासून केवळ 8 धावा दूर असुनही दिला स्ट्राइक घेण्यापासून नकार, संघासाठी घेतला निर्णय

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल 2022 च्या 50 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा 21 धावांनी पराभव केला आणि त्यांच्या खात्यात दोन महत्त्वाचे गुण जमा केले. दिल्लीच्या या विजयात रोव्हमन पॉवेल आणि डेव्हिड वॉर्नर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वॉर्नर शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने 92 धावा केल्या आणि पॉवेलही 67 धावा करून नाबाद परतला.

मात्र, शेवटचे षटक सुरू होणार असताना सर्वांच्या नजरा वॉर्नरवर होत्या, कारण 19 व्या षटकाच्या अखेरीस तो 92 धावांवर होता. मात्र, 20 व्या षटक संपल्यानंतरही तो 92 धावांवर कायम राहिला.

एक अर्धशतक आणि दुसरा शतकाच्या जवळ होता
शेवटच्या षटकात वॉर्नर शतक ठोकायला जाईल, असे चाहत्यांना वाटत होते, पण त्याने याचा अजिबात विचार केला नाही. अंतिम षटक सुरू होण्यापूर्वी, रोव्हमन पॉवेल आणि वॉर्नर दोघेही त्यांच्या वैयक्तिक विक्रमांच्या जवळ होते. पॉवेलला त्याच्या अर्धशतकासाठी एका धावेची गरज असताना, वॉर्नरला आयपीएल 2022 मध्ये पहिले शतक नोंदवण्यासाठी आठ धावांची गरज होती.

वॉर्नर म्हणाला, माझ्यापासून जितके दूर असेल तितके शॉट मार
मात्र, वॉर्नरने संघाला स्वतःहून पुढे ठेवत शतकाचा बळी दिला. रोव्हमन पॉवेल यांने ही गोष्ट जगासमोर आणली. पहिल्या डावानंतर पॉवेल म्हणाला, 'मी वॉर्नरला विचारले की त्याला शतक झळकावण्यासाठी सिंगल हवे आहे का, पण त्याने मला सांगितले की आपण अशा प्रकारे क्रिकेट खेळत नाही. वॉर्नर म्हणाला की माझ्यापासून शक्य तितके दूर शॉट मार आणि मग मी तसेच केले.

पॉवेलच्या या विधानावरून स्पष्ट होते की वॉर्नरने आपल्या संघासाठी शतकाचा त्याग केला आणि त्याचे बलिदानही कामी आले. कारण अखेरच्या षटकात पॉवेलने चौकार-षटकारांची बरसात करताना 19 धावा लुटल्या आणि शेवटी फरक दिल्लीच्या विजयात दाखवला.

बातम्या आणखी आहेत...