आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल 2021 मध्ये शेवटच्या स्थानावर राहिलेल्या SRH साठी 2022 च्या हंगामाची सुरुवात देखील खास झाली नाही. सुरुवातीचे दोन्ही सामने गमावल्यानंतर हा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.
सोमवारी लखनऊविरुद्ध हैदराबादचा सामना पाहण्यासाठी आलेली काव्या मारनही या सामन्यादरम्यान पूर्णपणे निराश दिसली. संघातील खेळाडू जसजसे बाद होत होते, तसतशी तिची निराशा वाढत होती. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयपीएल 2022 च्या लिलावापासून काव्या तिच्या संघासाठी खूप काम करताना दिसत आहे. ती प्रत्येक सामन्यात संघाला सपोर्ट करायला मैदानावर येते.
वॉर्नरकडून कर्णधारपद काढून काही फायदा झाला नाही
गेल्या मोसमात संघ सतत पराभूत होत होता, त्यानंतर व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आणि हंगामाच्या मध्यात डेव्हिड वॉर्नरकडून कर्णधारपद हिसकावून घेतले. आता 2022 च्या मोसमातही संघ सतत पराभूत होत आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर काव्या मारनच्या फोटोसह लोक कॅप्शनमध्ये लिहित आहेत की, त्यांनी वॉर्नरशी फोनवर बोलावे आणि त्याला सॉरी म्हणावे. वॉर्नरने आपल्या नेतृत्वाखाली 2016 मध्ये हैदराबादला विजय मिळवून दिला होता. आता या मोसमात वॉर्नर दिल्लीकडून खेळताना दिसणार आहे.
केन विल्यमसनही फ्लॉप दिसत आहे
हैदराबादचा कर्णधार दोन्ही सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. लखनऊविरुद्धच्या सामन्यात जेव्हा संघाला त्याची सर्वाधिक गरज होती, तेव्हा हा खेळाडू अवघ्या 16 धावा करून बाद झाला. हैदराबाद संघाची संपूर्ण फलंदाजी त्याच्याभोवती फिरते. त्याचवेळी अब्दुल समद आणि उमरान मलिक या खेळाडूंची यंदाची कामगिरीही या दोन्ही सामन्यांमध्ये विशेष राहिली नाही.
10 कोटींहून अधिक रकमेत संघात सामील झालेला निकोलस पूरनही हैदराबादला सामना जिंकून देऊ शकला नाही, त्यामुळे हा संघासाठी चिंतेचा विषय राहिला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.