आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहली, सिराजच्या जबरदस्त डान्सचा VIDEO:सामन्यापूर्वी विराटने केला डान्स, सिराजही दिसला जबरदस्त स्विंग करताना

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

IPL च्या 13 व्या सामन्यात एक आश्चर्यकारक घटना पाहायला मिळाली. राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात झालेल्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक झाल्यानंतर बेंगळुरूचे खेळाडू मैदानात मजा करताना दिसले. माजी कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज मैदानावरच नाचताना दिसले. चाहत्यांनी कोहलीच्या या डान्सचा चांगलाच आनंद घेतला. विराट कोहली अनेकदा आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी काहीतरी ना काही करताना दिसतो.

चाहत्यांचा आवडता डान्सर कोहली
कोहली पहिल्यांदाच मैदानावर डान्स मूव्हचा आनंद लुटताना दिसला नाही. याआधीही कोहली हॉटेल, मैदान आणि ड्रेसिंग रूममध्ये सहकारी खेळाडूंसोबत डान्स करताना दिसला आहे. अलीकडेच तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत हॉटेल कर्मचाऱ्यांसोबतही डान्स करताना दिसला होता.

कोहलीची बॅट चालली नाही
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, बंगळुरूने या सामन्यात राजस्थानचा 4 विकेट्सने पराभव केला. पुन्हा एकदा दिनेश कार्तिकने आपल्या बॅटने अप्रतिम कामगिरी केली. त्याचवेळी आरसीबीच्या डावातील 9व्या षटकातील चौथ्या चेंडूवर 5 धावा काढून विराट कोहली धावबाद झाला. पुन्हा एकदा मोठी खेळी कोहलीच्या बॅटमधून बाहेर पडू शकली नाही.

आरसीबीसमोर 170 धावांचे लक्ष्य होते, जे संघाने शेवटच्या षटकात 6 गडी गमावून पूर्ण केले. शाहबाज अहमदने सर्वाधिक 45 धावा केल्या, तर दिनेश कार्तिक 44 धावांवर नाबाद राहिला. आरआरकडून चहल आणि बोल्टने प्रत्येकी 2 बळी घेतले.

तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करताना राजस्थानने 3 गडी गमावून 169 धावा केल्या होत्या. जोस बटलरने 47 चेंडूत 70 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचवेळी शिमरॉन हेटमायर 31 चेंडूत 42 धावा करून नाबाद राहिला. आरसीबीकडून हसरंगा, विली आणि हर्षल यांनी 1-1 बळी घेतला.

बातम्या आणखी आहेत...