आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रन आऊट झाल्यानंतर निराश विराट:​​​​​​​रिप्ले पाहून डोक्याला लावाला हात, तर निराश होऊन हात जोर-जोरात टेबलवर मारला; VIDEO पाहा

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी झालेल्या RCB आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात विराट कोहलीच्या बॅटची जादू पुन्हा एकदा चालली नाही. आरसीबीच्या डावातील 9व्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराट रन आऊट झाला. यानंतर, जेव्हा तो ड्रेसिंग रूममध्ये गेला, तेव्हा त्याच्या आऊटचा रिप्ले पाहून त्याने त्याचे डोके पकडले तसेच त्याच्या समोरच्या टेबलावर जोरात हात मारण्यास सुरुवात केली.

कोहलीच्या बॅटमधून आतापर्यंत एकही मोठी खेळी झालेली नाही
कोहलीला या सीझनमध्ये आतापर्यंत एकही मोठी इनिंग खेळता आलेली नाही. विराट आऊट झाला तेव्हा त्याची टीम चांगलीच अडचणीत आली होती. 8.4 चेंडूवर पहिले त्याची विकेट पडली आणि नंतर डेव्हिड विली 8.5 चेंडूत युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद यांनी चांगळी खेळी केली आणि 32 चेंडूत 67 धावांची शानदार भागीदारी करून आरसीबीला सामन्यात विजय मिळवून दिला.

आरसीबीने 3 पैकी 2 सामने जिंकले
या सीझनमध्ये आरसीबीची कामगिरी चांगली झाली आहे. आतापर्यंत 3 सामन्यांत संघाने दोन सामने जिंकले आहेत. फॅफचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. आतापर्यंत आरसीबीला एकदाही आयपीएल चॅम्पियन बनता आलेले नाही. कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर आरसीबीने फॅफ डू प्लेसिसची कर्णधारपदी निवड केली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलही संघात सामील झाला आहे. आरसीबीविरुद्धच्या पुढील सामन्यातही तो खेळताना दिसू शकतो. त्यामुळे संघ अधिक मजबूत होईल.

कोहलीने 2019 मध्ये शेवटचे शतक झळकावले होते
विराट कोहलीचे चाहते विराट कोहलीच्या आयपीएल 2022 मध्ये शतक करण्याची वाट पाहत आहेत. विराटच्या बॅटने आयपीएलमध्ये 5 शतके झळकावली आहेत. त्याच वेळी, कोहलीचे शेवटचे शतक 22 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध झाले होते. या शतकानंतर त्याच्या बॅटमधून एकही शतक झळकलेले नाही. आता कोहलीच्या शतकाची प्रतीक्षा आणखी किती वाढवते हे पाहावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...