आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चहलने विकेट घेताच उत्साहात दिसली धनश्री:VIDEO मध्ये पाहा युजवेंद्रच्या पत्नीची दमदार रिअ‍ॅक्शन, संपूर्ण मॅचमध्ये दिसली उत्साहात

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

IPL 2022 मध्ये मंगळवारी राजस्थान रॉयल्स आणि बेंगळुरू यांच्यात सामना झाला. आरसीबीने हा सामना 4 विकेटने जिंकला. राजस्थान सामना भलेही हरला असेल, पण संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने अप्रतिम कामगिरी केली. त्याने 4 षटकात फक्त 15 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले. यादरम्यान चहलची पत्नी धनश्री स्टँडवरून आपल्या पतीला जोरदार चीयर करताना दिसली.

सामन्याच्या 9व्या षटकात चहलने आपल्या अप्रतिम चेंडूने डेव्हिड विलीला बोल्ड केले. यानंतर धनश्रीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. ती आनंदाने ओरडताना दिसली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धनश्री राजस्थानच्या प्रत्येक सामन्यात संघाला सपोर्ट करण्यासाठी येते. ती संघासह बायो-बबलमध्ये आहे.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही धनश्रीने पतीला केला होता सपोर्ट
आयपीएल 2022 चा पहिला सामना राजस्थानने हैदराबादविरुद्ध खेळला. पहिल्याच सामन्यात राजस्थानने SRH चा दारुण पराभव केला होता. या सामन्यात चहलच्या चेंडूंनीही कमाल केली. त्याने 22 धावांत 3 बळी घेतले. त्याचवेळी त्याची पत्नी धनश्री संपूर्ण सामन्यादरम्यान स्टँडमध्ये उपस्थित होती आणि पोज देताना दिसत होती. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

धनश्री एक प्रोफेशनल डान्सर आहे, यूट्यूबवर प्रसिद्ध आहे
धनश्री वर्मा ही एक प्रोफेशनल डान्सर आहे आणि तिचे डान्सशी संबंधित यूट्यूब चॅनल देखील आहे. धनश्री तिच्या चॅनलवर बॉलिवूड गाणी रीक्रिएट करते. याशिवाय ती हिप-हॉपचे प्रशिक्षणही देते. धनश्रीने डीवाय पाटील डेंटल कॉलेज नवी मुंबई येथून 2014 साली तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. चहल आणि त्याची पत्नी धनश्री दररोज त्यांचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. दोघांचे डिसेंबर 2020 मध्ये लग्न झाले.

राजस्थानचा पुढचा सामना लखनऊविरुद्ध
राजस्थानने या सीझनमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. दोनमध्ये संघ विजयी झाला आहे. त्याच वेळी, मंगळवारी संघाने या हंगामातील पहिला सामना गमावला. आता राजस्थानचा पुढचा सामना लखनऊविरुद्ध 10 एप्रिलला होणार आहे. लखनऊनेही या सीझनमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले असून त्यांनीही दोन सामने जिंकले आहेत आणि एक पराभूत झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...