आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीपेक्षा त्याच्या ज्युनियर्सना जास्त मानधन:CSK चे 3 खेळाडूही धोनीपेक्षा महागडे, ही पाहा IPL मधील महागड्या कर्णधारांची यादी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या 31 मार्चपासून 16 व्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलला सुरूवात होत आहे. या सीझनमध्ये आपापल्या आवडीच्या टीमसह आवडत्या खेळाडूंच्या परफॉर्मन्सवर चाहत्यांची नजर असणार आहे. यासोबतच सर्वांची नजर असते ती आयपीएलमध्ये कोणत्या खेळाडूला किती पैसे मिळाले याची. यंदाच्या आयपीएलमध्येही कोटीच्या कोटी उड्डाणे झाली आहेत. यात टीमच्या कर्णधारांना मिळणाऱ्या मानधनातून एक रंजक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे कोट्यवधी क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताइत असलेल्या महेंद्रसिंह धोनीपेक्षा त्याच्या ज्युनिअर सहकाऱ्यांना यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्यापेक्षा जास्त मानधन मिळणार आहे.

ज्यनियर्सपेक्षा धोनीला मानधन कमी

आयपीएलमधील कामगिरी आणि अनुभवाच्या बाबतीत सरस असूनही धोनीचे ज्युनियर सहकारी आपापल्या टीमचे नेतृत्व करताना यंदा धोनीपेक्षा जास्त मानधन घेतील. यात सर्वाधिक मानधन लखनौ सुपर जायंटसचा कर्णधार केएल राहुलला मिळेल. राहुलला 17 कोटी मानधन मिळणार आहे. तर संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर असे धोनीपेक्षा कमी अनुभवी कर्णधारही त्याच्यापेक्षा जास्त मानधन घेतील.

कोणत्या टीमच्या कर्णधाराला किती मानधन यंदा मिळणार आहे यावर एक नजर टाकूया...

  1. केएल राहुल - 17 कोटी (लखनौ सुपर जायंटस)
  2. रोहित शर्मा - 16 कोटी (मुंबई इंडियन्स)
  3. हार्दिक पंड्या - 15 कोटी (गुजरात टायटन्स)
  4. संजू सॅमसन - 14 कोटी (राजस्थान रॉयल्स)
  5. श्रेयस अय्यर - 12.25 कोटी (केकेआर)
  6. एमएस धोनी - 12 कोटी (चेन्नई सुपर किंग्स)
  7. शिखर धवन - 8.25 कोटी (पंजाब किंग्स)
  8. फाफ डू प्लेसिस - 7 कोटी (आरसीबी)
  9. डेव्हिड वॉर्नर - 6.25 कोटी (दिल्ली कॅपिटल्स)
  10. अॅडन मार्करम - 2.60 कोटी (सनरायझर्स हैदराबाद)

सीएसकेतील या 3 खेळाडूंचे मानधनही धोनीपेक्षा जास्त

या यादीशिवाय आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे धोनीचे मानधन त्याच्याच टीममधील तीन खेळाडूंपेक्षाही कमी आहे. मागील सीझनमध्ये काही सामन्यांसाठी कॅप्टन झालेल्या रविंद्र जडेजाला यंदा सीएसकेकडून 16 कोटी रुपये, सीएसकेचा दुसरा खेळाडू बेन स्टोक्सला 16.25 कोटी तर दीपक चहरला 14 कोटी रुपये मानधन मिळणार आहे.

ही बातमीही वाचा...

कोण आहे केएल राहुल?:विमानतळावर राखी सावंत क्रिकेटरला ओळखू शकली नाही, पापाराजी म्हणाले- सुनील शेट्टीचा जावई